दिनांक 19 जानेवारी 1990 साली हजारो काश्मिरी पंडितांना आपले घर-दार सोडून जावे लागले होते. काश्मीर सोडताना त्यांना प्रचंड वेदना झाल्या होत्या. नुकताच द काश्मीर फाइल नावाचा एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमामुळे काश्मिरी पंडित हा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. आजच्या लेखात आपण काश्मिरी पंडित यांना नेमकं असं काय कारण होतं की ज्यामुळे त्यांना काश्मीर सोडून रातोरात जावे लागले होते.
1985 पासून काश्मीर मधील परिस्थिति बिघडत होती. हिजबूल मुजाहिदीन, लिबरेशन फ्रंट यासारख्या संघटना त्यांचे हात- पाय पसरत होते. या संघटनांचा जोर आणखी वाढत होता. या संघटना हिंदूना त्रास देत होत्या. आझादी- आझादीचे नारे लागत होते. 1990 मध्ये जगमोहन यांना दुसऱ्यांदा राज्यपाल म्हणून नेमले गेले.
तेव्हा फारक अब्दुल्ला यांनी या गोष्टीचा निषेध केला. त्यांनी राजीनामा दिला त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू झाली. काही कट्टरवादी संघटनांनी या संधीचा फायदा घेतला आणि हिंदूना लक्ष करण्यास सुरुवात केली. त्यांच्या घरांना आगी लावल्या, पुरुषांना गोळ्या झाडल्या, महिलांवर अत्याचार केले. मंदिरे उदध्वस्त केली. हिवाळ्याच्या दिवसांत, देखील अंधारात लाखों हिंदूना रातोरात काश्मीर सोडावे लागले.
अनेकांनी आपल्या जवळच्या लोकांना गमावले. काश्मीर सोडून गेलेले अनेक पंडित जम्मू आणि दिल्ली येथे आसरा घेऊन राहू लागले. काश्मिरी पंडितांना फक्त त्यांच्या घरातून बाहेर काढलं नाही तर त्यांना मुळांपासून उद्ध्वस्त केले. या पंडितांना अजून देखील विश्वास बसत नाही की त्यांनाच त्यांच्या घरातून बाहेर काढलं.
जेथे ते कित्येक पिढ्यांपासून राहत होते. जम्मूमध्ये असे अनेक काश्मिरी पंडित कॅम्प बनवून राहू लागले. जम्मूमध्ये जूनमध्ये अतिशय कडक उन्हाळा असतो, या उन्हात कित्येकांचा मृत्यु झाला. विजय येमा काश्मिरी पंडितांचे नेते म्हणतात आम्हाला सर्वाण बद्दल तक्रार आहे.
सरकार, नागरिक आणि आपण निवडून दिलेले नेते यांनी आमच्यासाठी काहीच केले नाही. काश्मीर सोडून अनेक हिंदू बनारस, जम्मू येथे गेले, तेथे त्यांना वाटले येथे अनेक हिंदू लोक आहेत, ते आपलं दुख समजून घेतील, पण पैसा हा कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक महत्वाचा असतो. गेल्या 32 वर्षात तब्बल तीन लाखांहून अधिक हिंदू काश्मीर सोडून गेले आहेत. काही हिंदू मात्र अजून देखील काश्मीरच्या खोऱ्यात राहतात, पण त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
ते म्हणतात आमच्या येथे कोणाचे निधन जरी झाले तरी आमच्या नातेवाईकांना आम्हाला जम्मूवरुन बोलवावे लागते. लग्नासाठी देखील अनेक अडचणी येतात. आता आमची घरे देखील मोडकळीस आली आहेत, पण सरकार मात्र कोणतीच मदत करत नाही.त्यामुळे आम्हाला फार अडचणीना सामोरे जावे लागते. अनेक काश्मिरी पंडितांना आणि हिंदू यांना परत यायचे आहे पण सरकार मात्र त्यासाठी काही ठोस पाऊले उचलत नाही. सरकारने सर्व काश्मिरी हिंदूचे योग्य रीतीने पुनर्वसन करावे.