Home » म्हणून सिंधुताई सपकाळ यांचा दफनविधी करण्यात आला.
Articles खास तुमच्यासाठी!

म्हणून सिंधुताई सपकाळ यांचा दफनविधी करण्यात आला.


समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे काल रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी निधन झाले. सिंधुताई सपकाळ या हजारो अनाथांच्या माई होत्या. पण फार कमी लोकांना हे माहीत असेल की सिंधुताई या महानुभाव पंथाच्या अनुयायी होत्या. त्या महानुभाव हा पंथ मानत. रोज त्या पंथाची साधना पूर्ण करूनच त्या त्यांचे पुढील काम सुरू करत.

महानुभाव हा अतिशय प्राचीन पंथ आहे. या पंथाचा उगम महाराष्ट्रातच झाला असून संपूर्ण भारतात या पंथाचे अनूयायी आहेत. ज्ञान आणि भक्ती आणि अहिंसा या तत्वावर हा पंथ चालतो. सिंधुताई यांच्या सुरूवातीच्या काळात त्यांना या पंथाने मोठा आधार दिला. काही काळ त्या या पंथाच्या आश्रमात देखील राहिल्या होत्या. त्यांची अनेक भाषणे देखील यावर प्रसिद्ध आहेत.

या पंथामध्ये मनुष्याचा मृत्यु झाल्यानंतर त्याला अग्नि न देता त्यांचा दफनविधी करण्यात येतो. यामागील कारण असे आहे, की जेव्हा एखाद्या व्यक्तीला अग्नि दिला जातो, तेव्हा त्या अग्निमुळे अनेक जीव- जंतु यांना देखील हानी पोहचते. तसेच निसर्गाची देखील मोठ्या प्रमाणात हानी होते. म्हणून महानुभाव पंथामध्ये व्यक्तीचा मृत्यु झाल्यानंतर त्यांचा दफनविधी करण्यात येतो. सिंधुताई यांचा देखील दफन विधी करण्यात आला.