युद्ध हे संपूर्ण मानव जातीसाठी विघातक ठरत असते. युद्ध जरी दोन देशांमध्ये होत असले तरी त्यांचे परिणाम संपूर्ण जगावर होतात. जेव्हा दुसरे महायुद्ध झाले तेव्हा अनेकांनी एक भीती व्यक्त केली होती, ही भीती अशी होती की जर तिसरे महायुद्ध झाले तर संपूर्ण जगाचा विध्वंस होईल. तिसरे महायुद्ध तर झाले नाही पण सध्या रशिया आणि यूक्रेनमध्ये जे युद्ध सुरू आहे ते खरंच धोकादायक आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी लष्कराला कारवाईचे आदेश दिले आणि युद्धाला सुरुवात झाली. यूक्रेनहा एक छोटासा देश आहे.यूक्रेन काही वर्षापूर्वी सोवित संघातून बाहेर पडला. यूक्रेनला युरोपीय देशांशी सलगी करण्यामध्ये अधिक रस आहे , पण हीच बाब रशियाला मात्र काही रुचलेली नाही. तसेच यूक्रेनला अमेरिकेची असलेली नाटो म्हणजेच नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन यांचे सदस्य व्हायचे आहे.
पण रशियाला मात्र हे मान्य नाही. कारण यूक्रेन रशियासाठी नेहमीच समस्या ठरला आहे. जर यूक्रेन नाटोमध्ये सामील झाला तर नाटो देशांचे सैन्य आणि तळ रशियाच्या सीमेजवळ येतील. हे रशियासाठीधोकादायक ठरू शकते. नाटोची सुरुवात ही १९४९मध्ये झाली आहे. नाटोमध्ये ३० देशांचा समावेश होतो. नाटोवरती अमेरिकेचे वर्चस्व आहे. या ३० देशांपैकी सर्वाधिक देश हे युरोपीय देश आहेत.
या देशांचे एकत्रित एक सैन्य आहे पण यामध्ये सर्वाधिक सैन्य हे अमेरिकेचे आहे.अमेरिका रशियावर दबाव आण्यासाठी यूक्रेनला नाटोमध्ये सहभागी करून घेत आहे.
पुतीन म्हणतात यूक्रेन आता सार्वभौम देश राहिला नसून तो आता परकीय देशांची कठपूतली बनला आहे. रशियाचे म्हणणे आहे की यूक्रेनने नाटोचे सदस्यत्व स्वीकारू नये. स्वीकारणार नाही यांची खात्री देखील रशियाला द्यावी. तसेच स्वताचे नि:शस्त्रीकरण करून एक तटस्थ राष्ट्र म्हणून काम करावे. २०१४ मध्ये रशियाने यूक्रेनवरती हल्ला केला होता. त्यानंतर त्यांचे संबंध अधिकच बिघडले. आता त्यांचे रूपांतर युद्धात झाले आहे.
यूक्रेन आणि रशिया यांचे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. यूक्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात रशियन भाषा वापरली जाते. २०१४ मध्ये रशियाचे एक राष्ट्रअध्यक्ष यूक्रेनचे समर्थन करत होते. तेव्हा त्यांची हकालपट्टी करण्यात आली. तेव्हा यूक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये वादावादी झाली होती. तेव्हा तब्बल १४०० हून अधिक लोकांचा बळी गेला होता.
रशिया आणि यूक्रेन यांच्यामध्ये वाद होण्याचे दुसरे कारण म्हणजे यूएस आणि वेस्टर्न युरोपीन देशांनी नॉड स्टीम २ रोखलेली पाईपलाईन हे आहे. हा प्रकल्प रशियासाठी खूप महत्वाचा प्रकल्प आहे. यासाठी रशियाने अब्जावधी रुपये खर्च केला आहे. या पाइपलाईन द्वारे रशिया, फ्रान्स, जर्मनीसह संपूर्ण युरोपला गॅस व तेलाचा पुरवठा होणार आहे.
यापूर्वी देखील अशी पाईललाईन होती ती पाईपलाईन यूक्रेनमधून जात असे पण आता मार्ग बदलला त्यामुळे यूक्रेनला मिळणारे लाखों डॉलर्स आता बंद होतील. नवीन पाईप लाईनचे काम झाले तर यूक्रेनची मोठी कमाई बंद होईल.
यूक्रेन आणि रशिया यांचे अनेक भावनिक नाते संबंध आहेत. आधी यूक्रेन सरकार रशिया सरकारच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते पण आता यूक्रेन अमेरिकेशी सलगी करत आहे ही बाब रशियाला काही केल्या पटलेली नाही. कारण अमेरिका आणि रशिया यांचे संबध आधीपासून संपूर्ण जगाला माहीत आहे. यूक्रेन जर अमेरिकेसोबत गेले तर आपली बदनामी होईल अशी भीती रशियाला आहे. त्यामुळे रशिया यूक्रेनला नाटोमध्ये सहभागी होण्यापासून रोखत आहे.