Home » खाल्ल्या मीठाला जागा- सुप्रिया सुळे यांचा सुजय विखे यांच्यावर पलटवार.
Articles आपलं राजकारण

खाल्ल्या मीठाला जागा- सुप्रिया सुळे यांचा सुजय विखे यांच्यावर पलटवार.


महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राविषयी नेहमी चर्चा होत असते. विशेषता साखर कारखाने त्यांची अवस्था आणि त्यांच्या जाणाऱ्या राजकीय फायद्याविषयी देखील चर्चा होत असते. लोकसभेत राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव बोलताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे.

राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावच्या चर्चेत विरोधकांनी स्टार्टअप इंडिया, आत्म निर्भय भारत आणि शेतकरी सशक्तीकरण हे सगळं सुरूच सहकरी चळवळीतून झालं आहे. मी अशा कुटुंबात जन्माला आलो आहे, जिथे माझे पणजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशियातील पहिला सहकारी कारखाना सुरू केला.

हा स्टार्टअप इंडिया त्यांना दिसू शकला नाही. कारण यूपीए एक आणि दोन यांनी शेतकऱ्यांना एफआरपी देण्यासाठी कर्ज घेण्यास भाग पाडले आहे. यूपीएच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले आहेत. आज राज्यातल्या 70 टक्के मंत्र्यानी याच बंद कारखान्यांची फार कमी दरात खरेदी केली आहे.

आज ते त्यांचे मालक होऊ बसले आहेत. असा आरोप सुजय विखे पाटील यांनी केला. दरम्यान यानंतर खासदार सुप्रिया सुळे बोलायला उठल्या त्यांनी सुजय विखे पाटलांना टोला लगावला. सुप्रिया सुळे म्हणाल्या सुजय विखे पाटील यांनी आज यूपीए वन आणि यूपीए 2 वर टीका केली, तो त्यांचा अधिकार देखील आहे.

पण मी एक आठवण करून देते, त्यांचे वडील देखील या सरकारमध्ये होते. ते मंत्री होते. त्यामुळे त्यांनी जी काही टीका केली आहे. जे काही आरोप केले आहेत, ते त्यानी त्यांच्या वडिलांवर केले आहेत. हे आपल्या संस्कृतीत बसत नाही. मराठीत म्हणतात ना खाल्ल्या मीठाला जागा.

कधीही कुणाचंही अगदी 2 रुपयांचं देखील खाल्लं असेल तर ते नेहमी लक्षात ठेवा. ही माझी संस्कृती आहे. हे मला माझ्या आईने शिकवलं आहे. त्यामुळे 10 वर्ष तुम्ही ज्यांच्या सोबत होते ते गांधी घराण्यासोबतचे संबंध अगदी जवळचे होते हे विसरू नका. कदाचित तुम्ही विसरला असाल पण ही त्यांची पार्श्वभूमी आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.