सोशल मीडियावर रोज काहीतरी व्हायरलं होतं आणि आपल्याला देखील ते आवडतं. गाणं व्हायरलं झालं की ती मंडळी रातोरात सूपरस्टार होतात पण व्हायरलं होणं इतंक सोप्पं नसतं. सोशल मीडियावर रोज कित्येक विडियो येतात पण त्यातील सर्व विडियो व्हायरलं होतात असं नाही.
सध्या सोशल मीडियावर दक्षिणेतील सूपरस्टार अल्लू अर्जुन यांचा पुष्पा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील गाणी, डायलॉग सर्वच प्रेक्षकांना आवडत आहे. मूळ हा चित्रपट तेलगूमध्ये आहे. पण हा चित्रपट हिंदीमध्ये देखील डब केला आहे. या चित्रपटांतील श्रीवल्ली हे गाणे सध्या प्रचंड व्हायरलं होत आहे.
हे गाणं अनेक भाषेमध्ये बनविले गेले आहे. यूट्यूबवर मराठीत एक गाणं सध्या प्रचंड गाजलं आहे. मराठीतील हे श्रीवल्ली लोकांना प्रचंड आवडलं आहे. या गाण्याला तब्बल 49 लाखांहून अधिक व्हूज आले आहेत. हे गाणंअमरावती जिल्ह्यातील तिवसा त तालुक्यातील निंभोरे बैलवाडी येथील विजय खंडारे या युवकाने बनविले आहे.
गाणं सुंदर गायलं तर आहेच पण विडियो देखील सुंदर शूट केला आहे. विशेष म्हणजे हा विडियो पूर्णपणे मोबाईल वर शूट केला आहे. या गाण्याच्या मेकिंग विषयी विजय यांचाशी चर्चा केल्यानंतर विषयने या गाण्याच्या मेकिंगचचे अनेक किस्से शेअर केले आहेत. जनतेने दिलेल्या प्रेमामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले.
जनतेच्या मनोरंजनासाठी आम्ही अशा प्रकारचा नवनवीन कंटेट आणत राहू. आपल्या मराठी जनतेने दिलेल्या प्रेमामुळे विडियोला इतके व्हिज शक्य झाले आहेत. जेव्हा तेलगू गाणं रिलीज झालं तेव्हा मी ते सहज ऐकलं. हे गाणं ऐकायला मला फार मनमोहक वाटलं. म्हणून मी हे दोन- तीनदा ऐकलं.
त्यांच्या नंतर दोन-तीन दिवसांनंतर ते गाणे पुन्हा इतर भाषेत रिलीज झालं. पण ते पाहिल्यानंतर असं वाटलं की या भाषेत आहे तर आपल्या मराठी भाषेत का नाही. मला सहज वाटले आपण हे मराठीत करू. त्यानंतर मी मराठीत हे गाणे लिहायला घेतले. गाण्याचा साऊंडट्रक आणि चाल सेमच ठेवली. मात्र शब्द मराठीतील घेतले. गाणे लिहून झाल्यानंतर ते माझ्या घरच्या लोकांना ऐकवलं. माझी आई म्हणाली गाणं चांगलं झालं आहे.
त्या नंतर मी गाणं रेकॉर्ड केलं. दीड महिना झाला तरी गाणं कसं अपलोड करायचं हे माझ्या डोक्यात नव्हतं. नंतर मी गाणं शूट करायचं ठरवलं. त्यासाठी माझ्याकडे जास्त पैसे नव्हते पण मी पैशांची जमवा- जमवी केली आणि एका विडियो शूट करणाऱ्याला बोलविले. पण अचानक तो कॅमेरामन आलाचं नाही मग मात्र तो विडियो मोबाईलवर शूट केला.
तब्बल तीन दिवस आम्ही वेगवेगळे शॉट शूट केले. मला जितके प्रोफेशनल हवे होते तितके शॉट झाले नव्हते पण तरी देखील महाराष्ट्रातील जनतेला ते आवडले हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. अनेकांनी हा विडियो पाहून आम्हाला विशेष भावी आयुष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. मला फार आनंद झाला आहे.
त्यांचे प्रेम आणि प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. यापुढे देखील आपल्या जनतेसाठी काही नवीन घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असेल.