Home » नागपुरात पार पडला दोन तरुणीचा साखरपुडा. अशी जुळून आली रेशीमगाठ.
Articles काय चाललंय?

नागपुरात पार पडला दोन तरुणीचा साखरपुडा. अशी जुळून आली रेशीमगाठ.

मुलीचं मुलीशीच साखरपुडा तुम्ही कधी बघितलंच काय तर कधी ऐकलही नसेल. नागपूरची डॉ. सुरभी मित्रा व कोलकत्त्याची पारोमिता यांनी एकमेकींसोबत साखरपुडा पार पाडला. दोघींना आनंदीच्या आयुष्यासाठी भरभराटीच्या शुभेच्छा दिल्या जातांय.

नागपूरची सुरभी मित्रा डॉक्टर आहे आणि पच्छिम बंगाल ची पारोमिता एक कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी आहे. त्यांनी नागपुरमध्ये एका रिसॉर्ट वर त्यांचा साक्षगंध सोहळा पार पाडला आहे. त्या दोघींनाही त्यांच्या कुटुंबांचा पाठींबा मिळालाय. येणाऱ्या वर्षी दोघीही एकमेकांच्या विवाह बंधनात अडकणार आहे. ह्या दोघींनाही आई होण्याची इच्छा आहे. त्या दोन्ही मुल दत्तक घेण्याचा किंवा सरोगसिचा पर्याय निवडणार आहे.

कुटुंब, नातेवाईक, मित्र, यांनीही त्यांच नात स्वीकारलंय व त्यांना पाठिंबाही दिला आहे. सुरभीने १९ वर्षाची असतांना तिच्या वडिलांना सांगितलं होतं. तिला महिलांविषयी रोमँटिक अट्रॅक्षण असल्याचं सांगितलं. ते एक डॉक्टर आहेत, त्यांनी अभ्यास केला, आणि काही मानसोपचार तज्ञांनाही ते बोलले. तेंव्हा त्यांना या विषयी महिती मिळाली, व त्यांचा विरोध मावळला. सुरभीची व पारोमिता ची भेट कोलकत्त्याच्या कॉन्फरन्स मध्ये झाली. सुरुवातीला इन्ट्राग्राम त्यानंतर व्हाट्सएप वर त्यांचं बोलन झालं. सुरुवातीला त्यांच्या गप्पा रंगल्या, नंतर आवडी जुळल्या मग पारोमिताने प्रपोज केलं व सुरभीने होकार दिली, त्यानंतर दोघींनी ऑगस्ट मध्ये साखरपुड्याचा निर्णय घेतला