माणुसकी हरवत चालली आहे, असं आपण नेहमी म्हणतो आणि अचानक काही गोष्टी समोर येतात आणि आपल्याला पुन्हा वाटतं माणुसकी जीवंत आहे.आता हेच पहा ना मुंबईतील एका स्विगी बॉयने चक्क एका सेवानिवृत्त कर्नल यांचा जीव वाचविला आहे. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर नेमकं काय घडलं?
25 डिसेंबरचा दिवस होता सेवानिवृत्त कर्नल मालिक यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. त्या तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविणे गरजेचे होते. कर्नल यांचा मुलगा मोहन मालिक त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन निघाला. पण सुट्टी असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड ट्राफिक होते. वाहने अगदी मुंगीच्या गतीने पुढे सरकत होती. कर्नल मोहन यांना वडिलांची अवस्था पासून अधिकच चिंता वाटू लागली. त्यांनी त्यांना चार चाकी मधून काढून दुचाकी नेण्याचे ठरविले.
त्यांनी अनेक दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न केला पण कोणीच मदत करायला तयार नव्हते. मृणाल त्यांच्यासाठी देवदूता सारखा धावून आला, त्याने त्यांचे काम बाजूला ठेवले आणि मालिक यांना मदत केली. मृणालने स्वताच्या दुचाकीवर कर्नल यांना लीलावती रुग्णालयात पोहचवले. जेव्हा तो कर्नल यांना गाडीवर घेऊन जात होता तेव्हा तो ट्राफिकमध्ये मार्ग काढण्यासाठी जोरजोरात ओरडत होता.
त्यामुळे भल्या ट्राफिकमध्ये देखील जाण्यासाठी रस्ता मिळाला. कर्नल जेव्हा दवाखान्यात पोहचले तेव्हा त्यांची स्थिती गंभीर होती. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केले. त्यामुळे कर्नल यांना जीवनदान मिळाले. काही आठवड्या नंतर निवृत्त कर्नल मोहन मालिक ठणठणीत बरे झाले त्यांना सर्वात आधी आठवण आली ती मृणालची, त्यांनी मृणालबद्दल विचारणा केली. तसेच त्यांचे आभार मानणारी पोस्ट देखील केली आहे.
मोहन मालिक यांनी मृणालला तारणहार असे म्हटले आहे. माझ्यासाठी तो खरंच तो तारणहार आहे. कारण तो जर नसता तर आज मी माझ्या कुटुंबीयांसोबत नसतो. त्यांचे आणि त्यांच्या सारख्या असंख्य डिलिव्हरी बॉय नायकांचे मनापासून आभार.