सेनेतील सर्वांची मानसिकता एक झाली आहे,आपल्याला म्हणजेच शिवसेनेला कुठे तरी दुय्यम वागणूक मिळत आहे. हे अर्थ संकल्पातून देखील समोर आले आहे. कारण 65-60 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30-35 कॉंग्रेस, आणि 16 टक्के फक्त शिवसेनेला दिलं जात.
यामध्ये उच्च – तंत्रशिक्षण खात आमच्या पक्षाकडे आहे, 16 टक्के बजेट मधलं 6 टक्के बजेट तर पगारसाठी जातं. विकासासाठी उरतं अवघे 10 टक्के. विरोधी पक्ष बोंबलतआहे. त्याचं काम आहे ते.
आम्हाला खेदाने हे सांगावं लागत आहे की, आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील, सोलापुर जिल्ह्यातील साधा राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्य देखील छाताडावर नाचतो. कारण त्यांच्याकडे निधी असतो. खासदारांकडे देखील यांच्या पेक्षा कमी निधी असतो.
आमच्यामुळे हे सत्तेत आले ,आमच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत.आमचीच घडी विस्कटली आहे. आम्ही हे सहन करणार नाही. असा घणाघात तानजी सावंत यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसवर केला आहे