Home » दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नमले होते
Articles आपलं राजकारण खास किस्से खास तुमच्यासाठी!

दीडशे वर्ष राज्य करणारे इंग्रज देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर नमले होते


1660 सालची गोष्ट आहे, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. त्यामुळे मुघलांचे देखील धाबे चांगलेच दणाणले होते. पण सिद्धी जोहरला मात्र स्वताच्या पायांवर धोंडा पाडायचा होता, त्याने 30 -40 हजार फौज सोबत घेतली आणि स्वराज्यावर चाल केली. त्यांच्या रस्त्यात असणारी सर्व गावे त्यांनी उद्ध्वस्त केली.

महाराजांना ही खबर लागली की सिद्धीने स्वराज्यांवर आक्रमण केले आहे, त्याला थांबविणे फार गरजेचे आहे.महाराजांनी लगेच पन्हाळ्याकडे धाव घेतली. सिद्धीला तेथेच थांबविणे सोप्पे होते. सिद्धीला बाहेरच्या बाहेर पळवून लावणे शक्य होते. सिद्धीला सुद्धा महाराज पन्हाळ्यावर आले आहेत ही खबर पोहचली.

सिद्धीने फार हुशारीने पन्हाळ्याला वेढा घातला, हा वेढा फार घट्ट होता. सिद्धीला यासाठी राजापुरच्या इंग्रज व्यापाऱ्यांनी मदत केली. महाराज ही गोष्ट माहीत झाली त्यांना या गोष्टीचा फार राग आला. या बरोबरच विशाल गडाजवळ शृंगारपुरचा राजा सूर्यराव सुर्वे तसेच पालवणचा राजा जसवंत सिंग दळवी यांनी देखील सिद्धीला मदत केली होती. हीच गोष्ट महाराजांना फार खटकली.

महाराज राजापुरलापोहचले, तेथे त्यांनी स्थानिक अंमलदारांकडून आणि इंग्रज व्यापाऱ्यांनाकडून खंडणी वसूल केली. इंग्रज व्यापाऱ्यांना खंडणी देण्यास नकार दिला. सिद्धीला मात्र तोफगोळा पूर्विणारा इंग्रज अधिकारी हिंडणी रेवीटगं हा त्यावेळी राजापूरला होता.

शिवाजी महाराजांनी त्याला आणि अन्य सात इंग्रज अधिकाऱ्याना कैद केलं. इंग्रजांनी वखारीमध्ये जे काही द्रव्य होतं ते पुरून ठेवलं होतं.महाराजांनी ते उकरून जप्त केलं. कैद केलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांना सोनगडच्या किल्ल्यांवर कैद केलं गेलं. कित्येक दिवस हे इंग्रज अधिकारी महाराच्या कैदेमध्ये होते.

ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी अँडरी रज हा होता.त्याने या कैदेत असलेल्या अधिकाऱ्याना पत्र लिहिले आणि सांगितले तुम्ही शिवाजी महाराज यांच्या विरोधात जी जोहरला मदत केली होती त्यांचे हे फळ तुम्ही भोगत आहात.

या इंग्रज अधिकाऱ्यांच्या मुक्ततेसाठी कोणीच प्रयत्न केले नाहीत कारण महाराज यांच्याशी लढण्याची कोणाची हिंमत नव्हती.यातील दोनजण तर कैदेतच मेले तर इतरांची जानेवारी 1663 मध्ये सुटका झाली. अशा प्रकारे महाराजांनी इंग्रजांना देखील झुकविले होते.