Home » युक्रेनमध्ये जीव गमावलेल्या मुलांचे वडील म्हणतात, त्याला 97 टक्के गुण असून देखील भारतात प्रवेश मिळाला नाही
Articles खास तुमच्यासाठी!

युक्रेनमध्ये जीव गमावलेल्या मुलांचे वडील म्हणतात, त्याला 97 टक्के गुण असून देखील भारतात प्रवेश मिळाला नाही


यूक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये मोठे युद्ध सुरू आहे. या युद्धांमध्ये आता पर्यत अनेकांना आपला जीव गमावला आहे. यूक्रेनमध्ये सर्वाधिक भारतीय विद्यार्थी आहेत. हे सर्व विद्यार्थी तेथे मेडिकलचे एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले आहेत. पण यूक्रेनमधील खारकीवमध्ये गोळीबार झाला आणि कर्नाटकमधील 21 वर्षीय नवीन शेखरप्पा यांचा मृत्यु झाला.

शेखरप्पा हा कर्नाटकमधील हावेरी येथील रहिवासी होता. त्यांचे वडील म्हणतात त्याला बारावीला 97 टक्के गुण होते पण त्याला मेडिकलला प्रवेश मिळाला नाही. शेखरप्पा म्हणतात त्याला इतके उत्तम मार्क्स असून देखील त्याला मेडिकलची एकही सीट मिळाली नाही.

भारतात करोडो रुपये खर्च करण्याची आमची तयारी नव्हती. मात्र मुलाने डॉक्टर व्हावे असे वाटत होते म्हणून यूक्रेनमध्ये त्याला शिकायला पाठविले पण तेथे मात्र वेगळेच घडले. शेखरप्पा यांच्या वडिलांनी आता परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

भारतातील 20 हजारांहून अधिक विद्यार्थी यूक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना लवकरात लवकर भारतात आणावे अशी मागणी त्या मुलांचे पालक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शेखरप्पा यांच्या वाडिलांचे सांत्वन केले आहे. यूक्रेनमध्ये सध्या अतिशय भीषण परिस्थिति आहे. तेथे अडकलेल्या भारतीयांना परत आणयासाठी मिशन गंगा आखले गेले आहे.