Home » पंचक्रोशीतील एकमेव महिला मेकॅनिक…
Articles खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

पंचक्रोशीतील एकमेव महिला मेकॅनिक…


महिलांनी मनावर घेतलं तर महिला काहीही करू शकता. आज पर्यत असे एक ही क्षेत्र नाही जिथे महिलांनी त्यांच्या कामाने ठसा उमटविला नाही. आज प्रत्येक क्षेत्रात तिने उंच भरारी घेतली आहे. शहरात महिलांसाठी सर्व कवाडे उघडी आहेत पण खेड्यात अजून देखील महिलांना स्वताच्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागत आहे.

ग्रामीण भागात महिला जास्तीत जास्त शेतात जातात, काम करतात, काही महिला शिलाई करतात. घरगुती व्यवसाय करतात पण इतर क्षेत्रात मात्र महिलांना आणखी देखील विरोध होतोच. आता हेच पहा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील, जयश्री गोविंद आंभोरे या त्यांच्या पंचक्रोशीतील एकमेव मेकॅनिकलाआहेत. जयश्री मागील आठ वर्षांपासून सर्व प्रकारची दुरुस्तीची कामे करतात जसे की मिक्सर, कुकर आणि इतर इलेक्ट्रिक वस्तु.

त्यांचे पती देखील हेच काम करतात. जयश्री म्हणतात आधी मला हे काम अवघड वाटलं पण नंतर सवय झाली. आता उलट नवीन शिकण्याची उत्सुकता वाढते. मला सर्व प्रकारची कामे जमतात. आधी लोक देखील मला म्हणायचे की ताई तुम्ही कसं काय हे काम करतात पण आता लोक देखील कौतुक करतात. मी स्वताच्या पायावर उभी आहे यांचा मला खूप आनंद आहे. महिलांनी ठरवलं तर त्या काहीही करू शकतात.

आता मला चार पैसे जरी लागले तरी सतत नवऱ्याला मागत बसावे लागत नाही. माझ्याकडे माझ्या कष्टाचे चार रुपये असतात. मी तेच खर्च करते. आधी मला देखील थोडा विरोध झाला होता, महिला कुठे मशीन भरतात का, मोटरी जोडतात का? पण आता मात्र तसे नाही. आता लोकांना देखील माझ्या कामावर विश्वास निर्माण झाला आहे, एकूणच काय जयश्री सांगतात प्रत्येक महिलेने स्वताच्या पायांवर उभे राहायला हवे.

नवीन जे आवडतं ते करायला हवं. आता मला आणखी पुढचं शिकायचं आहे. मी माझ्या नवऱ्याला मदत करू शकते या गोष्टीचा मला फार आनंद आहे.