Home » 40 पेक्षा जास्त टॅक्सी चालकांना मारून मगरांना मृतदेह खाऊ घालणारा ‘डॉक्टर’
Articles झाल कि व्हायरल!

40 पेक्षा जास्त टॅक्सी चालकांना मारून मगरांना मृतदेह खाऊ घालणारा ‘डॉक्टर’


डॉक्टरांना आपण देवमाणूस मानतो. पण काही डॉक्टर मात्र अपवाद असतात. ते निगरगट्ट आणि गेंडयाच्या कातडीचे असतात.आज आपण अशाच डॉक्टर म्हणजेच देवमाणसाची माहिती जाणून घेणार आहोत.सध्या हा डॉक्टर जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.या डॉक्टरने 40 पेक्षा अधिक टॅक्सीचालकांची हत्या केली असून त्यांचे मृतदेह मगरीना खाऊ घातला आहे.

आरोपीचे नाव आहे देवेंद्र शर्मा. डॉक्टर देवेंद्र शर्मा हा मूळचा उत्तर प्रदेश अलिगढ जिल्ह्यातील पुरेनी गावचा. तो गेल्या 16 वर्षांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. 1984 साली त्याने आयुर्वेद मेडिसीन मध्ये शिक्षण पूर्ण केले.त्यानंतर त्याने राजस्थानमध्ये स्वताचं एक क्लिनिक सुरू केलं.

देवेंद्रने किडनी ट्रान्सप्लाटच्या रॅकेटमध्ये सहभागी झाला.तो प्रती ट्रान्सप्लाट हिशोबाने सात लाख रुपये घ्यायचा. असे एकूण 125 ट्रान्सप्लाट केले.तो देशभरात सर्वत्र फिरायचा रात्रीची वेळ बघून तो टॅक्सी करतरस्ता सामसुम दिसताच त्यांचा फायदा घेऊन टॅक्सी चालकांची तो हत्या करायचा त्यांच्या किडनी काढत असे,आणि त्यांचा मृतदेह मगरीना खाण्यासाठी नदीत फेकून देत असे.

तो टी टॅक्सी चोरत असे आणि पुढे विकत असे. अखेर 2004 मध्ये त्यांच्या पापंचा घडा भरला. पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या पोलिसांनी केलेल्या चौकशीत सर्व गुन्हे कबूल केले.