महाराष्ट्रात भाजप सरकार पाडणार नाहयाई, पण अंतरविरोधामुळे ते पडेल. तेव्हा भाजपा पर्याय सरकार देईल, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले आहे. आता आम्ही 2024 च्या निवडनूकीची तयारी सुरू केली आहे.राज्यात भाजप स्वबळावर सत्ता मिळवेल. असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
विधानसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार पाडण्याची मोहीम भाजप हाती घेईल. अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. फडणवीस यांनी मात्र या गोष्टीचा त्यांनी साफ इन्कार केला आहे.
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना जोरदार झटका बसला आहे. कारण त्यांची मते ही नोटा पेक्षा देखील कमी आहेत. फडणवीस यांनी यावरून त्यांची खिल्ली उडविली आहे. कॉंग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुंबईसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्वबळावर लढविल्या जाणार आहेत. काल पाच राज्याचे निकाल जाहीर झाले. भाजपाने चांगले यश कमावले आहे. पंजाबमध्ये केजरिवाल यांच्या आम आदमी पार्टीने इतर सर्व पक्षांना धूळ चारली आहे. आधी दिल्ली आणि आता पंजाब अशी जोरदार कामगिरी सुरू आहे.
शिवसेनेला जुना पक्ष असून देखील सेनेला गोव्यात नोटा पेक्षा कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे सेनेवर सर्व स्तरातून टीका होत आहे. आप ला राजकारणात येऊन केवळ 10 वर्ष झाले आहेत तरी देखील आपने उत्तम यश मिळवले आहे.