अनेकदा आपण चार चाकी मधून प्रवास करत असतो, काय लावायचं ? काय लावायचं म्हणून आपण एफएम लावतो. आणि एफएमवर एक जाहिरात सारखी लागते ती म्हणजे तुमच्या मोबाइल,लॅपटॉप, आणि कंम्प्युटरच्या सुरक्षितेसाठी आजच क्विक हील अॅंटीवायरस वापरा. क्विक हील हा शब्द वाचून आपल्याला वाटतं अरे ही कोणती परदेशी कंपनी असेल किंवा बाहेरच्या देशांतील ब्रॅंड असेल.
पण जेव्हा आपण यांची माहिती घेतो तेव्हा मात्र आपण आश्चर्यचकित होतो. अरे हा तर आपल्या मराठी माणसाचा ब्रॅंड आहे. पहिल्यांदा तुम्ही पाहता तेव्हा तुम्हाला हे खोटं वाटतं पण नंतर मात्र माहिती वाचल्यानंतर तुमचा विश्वास बसतो. आता आपण क्विक हील बद्दल जाणून घेऊया.
जसं जसं तंत्रज्ञान आलं तसं तसं त्यांचे धोके देखील निर्माण झाले. कारण यामध्ये देखील व्हायरस घुसू शकतो. एक व्हायरस संपूर्ण संगणक निरउपयोगी करू शकतो. या उपकरणांचे व्हायरस पासून रक्षण करण्यासाठी अँटी व्हायरस सॉफ्टवेअरचा शोध लावला गेला. क्विक हीलचं नाव आधी समोर येतं. भारतातील सायबर सुरक्षा प्रधान करणारी कंपनी म्हणजे क्विक हील होय.
आज या कंपनीची आजची कमाई ही 54. 8 कोटी इतकी आहे. या कंपनीचे एकूण बाजारमूल्य 1341 कोटी इतके आहे. कैलास काटकर आणि संजय काटकर या दोन भावांनी ही कंपनी सुरू केली.या कंपनीचे खरे जनक आहेत, कैलास काटकर. कैलास काटकर यांनी शिक्षण अर्ध्यावर सोडले. त्या नंतर त्यांनी कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम सुरू केलं. त्यातूनच त्यांना क्विक हीलची कल्पना सुचली. कैलास यांना सुरुवातीपासून अभ्यासाची आवड नव्हती.
त्यांनी दहावी नंतर कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम सुरू केलं. त्यातून त्यांना महिन्यायाकाठी 400 रुपये मिळायचे. पण हळूहळू कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं काम कमी होऊ लागलं. कारण लोक आता मोठ्या हिशोबासाठी देखील संगणक वापरू लागले होते. कारण त्यामध्ये कॅल्क्युलेटर देखील होतं.
कैलास यांचे वडील देखील फिलिप्स कंपनीमध्ये कामाला होते. त्यांचे वडील देखील रेडिओ दुरुस्त करायचे. कैलास देखील हे देखील काम करू लागले यातून त्यांना महिन्यांकाठी 2000 हजार रुपये मिळू लागले. कैलास हळू- हळू प्रिंटर, रेडीओ आणि संगणक दुरुस्त करू लागले.
त्यांनी 1991 साली स्वताचे दुकान सुरू करण्याचे ठरविले. कैलास यांचा भाऊ संजययाला देखील बारावी नंतर शिक्षण सोडायचे होते पण कैलास यांनी त्याला पुढील शिक्षण करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या संगणकाच्या कोर्ससाठी कैलास आणि त्यांच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने 5000 हजार रुपये जमा केले. कैलास यांनी 15000 हजार रुपये गुंतवणून स्वताचे दुकान सुरू केले. त्या नंतर त्यांना न्यू इंडिया इन्शुरन्ससाठी संगणक आणि इतर मशीन दुरुस्तीचे वार्षिक काम मिळाले.
कैलास यांनी जेव्हा सर्वात आधी एक बँकेत संगणक पाहिला आणि ते चक्क त्या संगणकाच्या प्रेमात पडले, तेव्हाच त्यांनी हेरले की पुढील येणारा सर्व काळ हा संगणकाचा असेल. त्यांनी पदरचे 50 हजार रुपये गुंतविले आणि एक संगणक विकत घेतला.
त्यांच्या घरात पैशांची गरज असून देखील कैलास यांनी त्यांच्या व्यवसायाला प्राधान्य दिले. कैलास यांनी जेव्हा संगणक घेतला तेव्हा त्यांच्या दुकानात अनेक लोक संगणक पाहण्यासाठी येत. कैलास यांनी संगणक दुरुस्तीचे काम सुरू केले. दुरुस्ती करताना त्यांच्या लक्षात आले, संगणकामध्ये व्हायरस आहे. यावर काहीतरी करायला हवे. कैलास यांनी संजय यांना अॅंटी व्हायरस प्रोग्रामवर लक्ष केंद्रित करायला लावले. संजय त्यावेळी मास्टर्स करत होता.
त्याने दोन अॅंटी व्हायरस सॉफ्टवेअर बनविले. त्यांची चाचणी कैलास यांच्या दुकानात संगणक येत दुरुस्तीसाठी त्यावर घेतली. यातूनच कैलास आणि संजय यांच्या लक्षात आले भविष्यात या अॅंटी व्हायरसला खूप मागणी येणार आहे.त्यांनी 1995 साली क्विकहील नावाचे स्वताचे उत्पादन लॉंच केले. क्विक हील 700 रुपयांना विकला जाऊ लागला. ज्यामुळे उपलब्ध जितके अॅंटी व्हायरस होते त्यापैकी क्विक हील सर्वात स्वस्त पर्याय होता.
त्यानंतर या दोन्ही भावांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.कैलास यांनी संगणक दुरुस्ती थांबविली.कैलास मार्केटिंग पाहू लागले ,तर संजय संशोधन. सुरुवातीची पाच वर्ष या भावडांसाठी फार अवघड होती पण नंतर मात्र त्यांनी काही बदल केले आणि एक वेगळीच ऊंची गाठली.