Home » चिन्यांचा आवाज बंद करण्यासाठी मोदी सरकारने या माणसांची निवड केली आहे
Articles आपलं राजकारण

चिन्यांचा आवाज बंद करण्यासाठी मोदी सरकारने या माणसांची निवड केली आहे


चीन हा देश असा देश आहे की जो संपूर्ण जगाला काही सुधारू देत नाही. चीन हे जग रूपी वर्गातील एक लबाड, धूर्त देश आहे. चीन पासून भारताला फार मोठा धोका आहे. भारताच्या अनेक सीमावर चीनने घुसखोरी केली आहे. भारत मागील काही दिवसांपासून चीनवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने चीनवर लक्ष ठेवण्यासाठी अशा माणसाची निवड केली आहे, ज्याला चीनची खडा- खडा माहिती आहे. हा माणूस म्हणजे विक्रम मिस्त्री होय.

विक्रम मिस्त्री यांनी भारतीय सुरक्षक समितिमध्ये उपाध्यक्ष पदावर नियुक्त करून एक मोठं पाऊल उचललं आहे. विक्रम मिस्त्री हे एनएस चीफ अजित डोवाल यांना रिपोर्टिंग करणार आहेत. मिस्त्री यांनी चीनमध्ये राजदूत म्हणून काम केले आहे. विक्रम मिस्त्री हे 1989च्या बॅचचे इंडियन फॉरेन सर्व्हिसेस चे ते ऑफिसर आहेत. विक्रम मिस्त्री यांच्या आधी पंकज सरन हे भारतीय सुरक्षा समितीच्या उपाध्यक्षपदी कार्यभार सांभाळत होते. 31 डिसेंबर रोजी पंकज सरण यांचा कार्यकाळ संपला आणि विक्रम यांची त्या जागी निवड करण्यात आली. विक्रम यांनी म्यानमार आणि स्पेनसाठी भारतीय राजदूत म्हणून काम केले आहे.

माजी पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल, मनमोहन सिंग आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागार पदाचे काम विक्रम मिस्त्री यांनी केले आहे. 2019 मध्ये चीनमधील बीजिंगमध्ये झालेल्या एका बैठकीत विक्रम मिस्त्री यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. जून 2020 मध्ये गलवाल खोऱ्यात झालेल्या चकमकीत चीन सोबत चर्चा करण्यासाठी देखील मिस्त्री यांची निवड करण्यात आली होती.

जून 2020 साली गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यामध्ये चकमक झाली या चकमकी नंतर विक्रम मिस्त्री यांना भारत आणि चीन यांच्यातील झालेल्या उच्चस्तरीय बैठकीला मिस्त्री उपस्थित होते. त्यांनी चीनला त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली. त्यानंतर परिस्थिति निवळली. विक्रम मिस्त्री हे मूळचे श्रीनगरचे आहेत.

विक्रम मिस्त्री यांनी एमबीए चे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी काही वर्ष जाहिरात क्षेत्रात देखील काम केले आहे. त्यांना आधीपासून प्रशासकीय सेवेमध्ये जायचे होते त्यामुळे त्यांनी फ्रेंच भाषा देखील शिकली आहे. 1989 पासून विक्रम मिस्त्री यांनी त्यांच्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. ते 1991 ते 1993 मध्ये ब्रूसेल्स येथे 1993 ते 1996 मध्ये ट्यूनिस येथे भारतीय सल्लागार म्हणून काम केले आहे.

2020 च्या कोरोना काळात भारत आणि चीन या दोन्ही देशातील तनाव वाढू नये मिस्त्री यांनी काम केले आहे. विक्रम मिस्त्री यांनी अनेक वर्ष अनेक देशसोबत काम केल्यामुळे विक्रम मिस्त्री यांना उत्तम अनुभव आहे. त्यांचा चीनचा बारीक अभ्यास देखील आहे. चीनला समजेल अशा भाषेची त्यांना उत्तम जान आहे. चीनचे तोंड कसे बंद करायचे हे मिस्त्री यांना चांगलेच माहीत आहे. त्यामुळे मिस्त्री चीनला आता कसं सरळ करतात हे पाहणे रंजक आणि महत्वपूर्ण ठरणार आहे.