माणूस जेव्हा संपूर्ण जगाला वैतागतो, जीवन जगण्यासाठी त्याला एकही मार्ग किंवा आशेचा किरण उरलेला नसतो,तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात आत्महत्येचा विचार येतो. आत्महत्या करणं म्हणजे काय? तर स्वताच स्वताचा जीव गमावणं. पण आपल्या डोळ्यासमोर जेव्हा एखादा व्यक्ती जीव देतो, तेव्हा मात्र आपल्याला राहवत नाही आपण त्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न करतो. असचं काही नागपूरच्या जगदीश खरे यांच्या सोबत झालं.
तब्बल 28 वर्षांपूर्वी जगदीश आणि त्यांचे काही मित्र नागपुरातील गांधी सागर तलावा जवळ बसले होते,तेव्हा त्यांच्या वस्तीत एका मुलाने तलावात उडी मारली. त्याला वाचविण्यासाठी जगदीश यांनी मज्जेत उडी मारली. पण तो व्यक्ती काही वाचला नाही. त्या नंतर दोन – तीन दिवसांनंतर जगदीश पुन्हा त्या तलावाजवळ आले.
तेव्हा तेथील अनेकांनी जगदीश यांचे कौतुक केले.तू खूप पुण्याचे काम करत आहे, असे म्हटले. जगदीश यांनी ठरविले की ते लोकांचे जीव वाचवतील आणि समाजसेवा करतील. जगदीश गणेशपेठ पोलिसांची देखील मदत करतात. त्यांनी आता पर्यत शेकडो लोकांचे जीव वाचविले आहे. पत्नी जयश्री खरे देखील त्यांच्या कामात मदत करतात. आता पर्यत जगदीश यांनी 1500 हून अधिक लोकांचे जीव वाचविले आहे. त्यांच्या कामाची दखल घेत सिने अभिनेता अक्षय कुमारने 5 लाखांचे बक्षीस दिले आहे. या पैशांतून जगदीश यांनी शववाहिका घेतली आहे.
जगदीश म्हणतात आत्महत्या या सर्व गोष्टीवरील पर्याय नाही. आत्महत्या करून प्रश्न सुटत नाहीत.