Home » कोल्हापूरकर करांचा एकच सवाल, दादा तुमचं ओपन चॅलेंज विसरलात का?
Articles आपलं राजकारण

कोल्हापूरकर करांचा एकच सवाल, दादा तुमचं ओपन चॅलेंज विसरलात का?

चंद्रकांत पाटील महाराष्ट्रातील भाजपमधील एक फेमस व्यक्ती महत्व. दादा जे बोलतात त्यांची बातमी होते. त्यामुळे सोशल मिडियावर दादा फेमस आहेत, चंद्रकांत दादा मूळचे कोल्हापूरचे जरी असले तरी त्यांनी विधान सभा निवडणुक पुण्यातील कोथरूड भागातून लढविली.

ते तेथे लढले आणि जिंकले देखील पण अनेकांनी दादांवर टीका केली. दादा जर कोल्हापुरातून उभे राहिले असते तर ते निवडून आले नसते.दादा पराभवाच्या भीतीने पुण्यात पळून गेले. दादा देखील वैतागले होते त्यांना सतत एकच प्रश्न विचारला जात होता, कोल्हापूर सोडून पुण्यात का पळून गेला.

शेवटी दादांनी कोल्हापुरात झालेल्या एका कार्यक्रमात एक ओपन चॅलेंज दिलं, ते चॅलेंज असं होतं दादा म्हणाले मला कोणी म्हणत मी कोल्हापुरातून पळून आलो ,पण आज मी एक ओपन चॅलेंज देतो, कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्याही आमदाराने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी, मी उभा राहिला तयार आहे. निवडून नाही आलो ना तर , सरळ राजकारण सोडून हिमालयात जाईल. आज चॅलेंज आहे माझं. कोणी काही म्हणो.. डायरेक्ट फिल्डवर उतरू.

आता नागरिक म्हणत आहेत दादा ती वेळ आली आहे. मागील वर्षी कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. आता त्यांच्या जागेसाठी कोल्हापुरात पुन्हा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. मात्र चंद्रकांत पाटील त्यांचे ओपन चॅलेंज विसरले आहेत, किंवा ते कोथरूडलाच  हिमालय मानत आहेत, बहुधा, त्यामुळे ते आता या निवडणुकीवर काहीच बोलत नाही