Home » पेशव्यांनी उत्तर प्रदेशात शनिवारवाडा बांधला होता
Articles

पेशव्यांनी उत्तर प्रदेशात शनिवारवाडा बांधला होता


पेशवे दुसरे बाजीराव इंग्रजांना अखेर क्षरण आले. त्यामुळे पुण्यातून आणि महाराष्ट्रातून पेशवाई संपली. इंग्रज आणि बाजीराव यांच्यामध्ये त्यावेळी एक तह झाला, या तहा नुसार बाजीराव यांना तातडीने महाराष्ट्र सोडवा लागेल असे सांगण्यात आले. पेशव्यांनी उत्तरेस जावे असे त्यांना सांगण्यात आले.

बाजीराव यांनी त्यांच्यासोबत काही मराठी कुटुंबे देखील घेतली. यामध्ये बापू गोडबोले, बापू गोखले, बाळाजीपंत मराठे इत्यादि. बुंदेल खंडात मात्र अजून देखील युद्धाची आग पसरलेली होती. त्यामुळे पेशव्यांना राजपुताना मार्गे अजमेर, मथुरा या दिशेला जावे लागले. परंतु बाजीराव यांना कोठे ठेवायचे हे मात्र ठरलेले नव्हते. गोरखपुरचा विचार देखील सुरू होता पण तेथील गरम वातावरणामुळे पेशवे तयार झाले नाहीत. त्यामुळे अखेर कानपुर पासून 14 किलोमीटर दूर बिठूर म्हणजे ब्रह्मावर्त ही जागा बाजीराव यांना मान्य करावी लागली.

बिठूर येथे पेशवे स्थायिक झाले. आज देखील पेशव्यान सोबत गेलेली अनेक मराठी कुटुंबे बिठूर येथे आहेत. अजून ते लोक मराठी भाषा बोलतात. बाजीराव यांनी इंग्रज यांच्याकडे आग्रह धरला की त्यांना पंतप्रधान किंवा पेशवे असेच संबोधले जावे पण इंग्रज यांनी त्यांना महाराजा बाजीराव अशी पदवी देऊ केली.

इंग्रजांनी पेशव्यांना भपुर वार्षिक तनखा देऊ केला. सर्वात आधी बिठूर रेल्वे स्टेशन जवळ पेशव्यांसाठी एक दोन चौकी वाडा बांधण्यात आला होता. पण पेशव्यांना मात्र तो काही आवडला नाही. त्यांच्या थाटामाटाला तो साजेशा नव्हता त्यामुळे त्यांनी पुन्हा नवीन एक वाडा बांधला तो कित्येक एकर जमीनीत बांधण्यात आला होता त्याला पुन्हा शनिवारवाडा असे नाव देण्यात आले.

या वाड्यांमध्ये गालिचे, आरसे, चीनी वस्तु यांनी वाडा सजविण्यात आला होता.पेशव्यांच्या सर्व पूर्वजनांची चित्रे देखील भिंतीवर टांगली होती. वाड्याला सर्व बाजूनी तट बांधलेला होता. आतमध्ये 7 मोठ्या विहिरी देखील होत्या. एक सुंदर देऊळ देखील होते. ब्रिटिशांनी हा वाडा देखील तोफा लावून उद्ध्वस्त केला. वाडा उद्ध्वस्त झाला पण विहिरी मात्र तशाच होत्या.