Home » शेतकरी कर्जमाफीची प्रथा देशांत अंतुले यांनी सुरू केली
Articles आपलं राजकारण

शेतकरी कर्जमाफीची प्रथा देशांत अंतुले यांनी सुरू केली


महाराष्ट्र म्हणजे मराठ्यांचे राज्य, शिवाजी महाराज यांचा महान इतिहास लाभलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र त्यामुळे महाराष्ट्रात जे घडतं त्याचं अनुकरण संपूर्ण देशांत केलं जातं. आता हेच पहा ना देशांत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या देखील महराष्ट्रात झाल्या आहेत, त्या बरोबरच शेतकऱ्यांना सर्वात आधी कर्जमाफी देखील महाराष्ट्रातच मिळाली होती.

आता तुम्ही विचार कराल हे कसं काय शक्य आणि हे कोणी शक्य केलं. हे शक्य केलं ते कोकणातून पहिले मुख्यमंत्री झालेले बॅंलिस्टर झालेले रेहमान अंतुले यांनी. अंतुले यांनी संपूर्ण देशांत सर्वात आधी शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला. हा निर्णय प्रचंड गाजला. शेतकऱ्यांना अशा प्रकारे कर्ज माफी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते.

1980 काळ महाराष्ट्रमध्ये पहिल्यांदा कोकणातील पहिला मुख्यमंत्री तर झालाच पण त्या बरोबरच पहिला मुस्लिम मुख्यमं त्री देखील महाराष्ट्राला मिळाला. महाराष्ट्रात एक गोष्ट फार विशेष म्हणजे महाराष्ट्रात कोणत्याही जाती समूहाचे लोक असू ते छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवत मानतात.

अंतुले हे देखील छत्रपती शिवाजी महाराज यांना फार मानत. त्यांनी शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या रायगडाचे नाव कुलाबा होते ते बदलून पुन्हा रायगड केले. ह्या बरोबरच लंडनहून शिवाजी महाराज यांची तलवार परत आणण्याची घोषणा देखील केली.त्यांची ही घोषणा प्रचंड गाजली होती.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली त्या नंतर देशातील संपूर्ण राजकारण बदलून गेलं. अनेक दिग्गज लोकांनी कॉंग्रेसची साथ सोडली. महाराष्ट्रात देखील असंच काही झालं, यशवंतराव चव्हाण यासारख्या दिग्गज लोकांनी कॉंग्रेसची साथ सोडली.

मात्र अंतुले कॉंग्रेस सोबत होते, त्यांची इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्यावर निष्टा होती. त्यामुळे शरद पवार यांचे महाराष्ट्रात पुलोद सरकार पडले आणि पुन्हा निवडणुका झाल्या. यामध्ये इंदिरा गांधी यांचे कॉंग्रेस निवडून आले. इंदिरा गांधी यांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदासाठी एक नाव होते ते म्हणजे रेहमान अंतुले यांचे. अंतुले यांची गांधी घराण्यांवरील श्रद्धा कामाला आली आणि अंतुले मुख्यमंत्री बनले.

अंतुले यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे ते लाडके मुख्यमंत्री बनले. त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी कर्ज माफी जाहीर केली. अंतुले यांच्या निर्णयाचे राज्यात जोरदार स्वागत झाले, देशभरात चर्चा झाली पण आरबीआयने मात्र अंतुले यांना बरचं सुनावले. ही कर्ज माफी होती 40 कोटी रुपयांची. पण अंतुले यांनी आरबीआयला देखील दाद दिली नाही. त्यांनी कर्ज माफीचा निर्णय लागू केला.