Home » धावणाऱ्या प्रदीपने अनेकांची मने जिंकली, मदतीसाठी अनेक हात सरसावले
Articles खास तुमच्यासाठी! झाल कि व्हायरल!

धावणाऱ्या प्रदीपने अनेकांची मने जिंकली, मदतीसाठी अनेक हात सरसावले


सोशल मिडियामुळे अनेकांचं आयुष्य बदलून गेलं आहे. मागील दोन दिवसांपासून प्रदीप मेहराचा सोशल मिडियावर एक विडियो व्हायरलं झाला आणि त्याने अनेकांची मने जिंकली. लेखक विनोद कापरी यांनी हा विडियो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा मुलगा रोज 10 किलोमीटर धावतो.

त्याला आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे. या मुलांच्या विडियोची दखल अनेकांनी घेतली. उत्तर प्रदेश येथील गौतमबुद्ध जिल्ह्याचे डीएम सुहास एलवाई यांनी प्रदीपच्या भावाची भेट घेतली, प्रदीपच्या करियरसाठी आणि त्यांच्या आईच्या उपचारासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले. प्रदीपला अनेक चांगल्या कॉलेजस मधून देखील शिक्षण घेण्याच्या ऑफर आल्या आहेत, डीएम प्रदीपचे करियर मार्गदर्शन करणार आहेत.

त्या नंतर प्रदीप कोणत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यायचे हे ठरवणार आहेत. उत्तराखंड सरकार देखील प्रदीपच्या आईच्या उपचारासाठी मदत करणार आहे. या बरोबरच रिटायर आर्मी ऑफिसर लेफ्टनंट जनरल सतीश दुआ देखील प्रदीपला आर्मीमध्ये दाखल होण्यासाठी मदत करणार आहेत.