भगवान शंकरांच वर्णन करताना स्मशान योगी, चिता भस्म विलेपित, त्रिशूलधारी असे केले जाते. याच त्रिशूलाविषयीची काही अद्वितीय तथ्य आपण जाणून घेणार आहोत.
त्रिशूलाविषयीची आठ अद्वितीय तथ्य-

प्रभु विष्णूच्या सुदर्शन चक्राप्रमाणेच भगवान शंकराचे त्रिशूल हे आयुध महत्वाचे मानले जाते.

काही पुराण कथांनुसार शंकराने स्वता त्रिशूलाची निर्मिती केली तर विष्णू पुराणानुसार हे त्रिशूल समस्त देवांचा शिल्पकार विश्वकर्मा याने सूर्य किरणांपासून तयार केले असे सांगितले जाते.

भगवानांचे हे त्रिशूल उमा-महेश्वरा व्यतिरिक्त कोणी उचलू शकत नाही.याप्रमाणेच प्रभू विष्णूचे सुदर्शन चक्र लक्ष्मी-नारायणाशिवाय कोणी उचलू शकत नाही. (अश्वत्थाम्याने हे चक्र उचलण्याचा प्रयत्न करताच त्याची फजिती झाली होती.)

प्रभू रामचंद्र यांचे एक तथ्य नमूद केले जाते की, रामाने सोडलेला बाण न परतता त्याचे लक्ष्य साधतो, याप्रमाणेच महादेवाचे त्रिशूल कोणत्याही परिस्थितीत स्वताचे लक्ष्य गाठते.

महादेवाने भैरवाचे रूप घेतल्यावर ब्रह्माचे पाचवे डोके कापले होते.

त्रिशूल सृष्टीतील अनेक रचनांचे प्रतिक मानले जाते. उदा: त्रिगुणात्मक राजस, तामस, सात्विक. त्रिदेव, त्रिदेवी आणि प्रभू शंकराचे तीन मंत्र ॐ नमः शिवाय.
याच त्रिशूलाद्वारे महादेवाने गणपतीचे अहंकारी डोके धडावेगळे केले होते.

सनकचूड या भुताने विनाश माजवल्यावर या त्रिशूलाच्या प्रहाराने शंकराने सनकचूडचा वध केला व त्याला मुक्ती दिली. पूर्व जन्मी हा सनकचूड श्रीदामा अवतारात होता ज्याला राधा राणीने त्याच्या उर्मट व उद्दाम वर्तनासाठी शाप दिला होता.

त्रिशूल हे आपल्या शरीरातील तीन प्रमुख शक्ती वाहिनीचे प्रतिक आहे. इडा, पिंगला,सुषुन्मा.
Add Comment