पुणे वाहतूक पोलिस मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्याचं कारण देखील अगदी तसच आहे मागे काही महिन्यांपूर्वी नानापेठेत वाहतूक पोलिसांनी कारवाई दरम्यान क्रेनच्या सहाय्याने दुचाकी उचलली होती. त्यावेळी ती दुचाकी उचलतानाचा विडियो प्रचंड व्हायरलं झाला होता.
दरम्यान अशी घडना पुण्यातील लक्ष्मी रोडवर पुन्हा घडली आहे. पोलिसांनी थेट सामानासह दुचाकी उचलली आहे. पुण्यातील मुख्य बाजारपेठे म्हणजे लक्ष्मी रोड सोमवारी सकाळी 11 वाजता दोघेजण खरेदीसाठी गेले होते, त्यांचे सामान गाडीवरच होते. यावेळी त्यांची गाडी पांढऱ्या पट्टीच्या बाहेर होती.तेवढ्यात वाहतूक पोलिसांनी गाडी नो पार्किंगच्या पांढऱ्या पट्टीबाहेर लावलेल्या गाड्यांवर कारवाई करण्यात आली.
त्यावेळी दुचाकीवर खरेदी केलेले सामान देखील होते. पोलिसांनी त्या सामानासह गाडी क्रेनने उचलली. ज्यांची गाडी होती त्या चालकांनी पोलिसांना विनंती केली की गाडी खाली उतरवा, त्यावर आमचं सामान आहे, पण पोलिस मात्र ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.
ज्यांची गाडी होती ते खूप विनवणी केली करत होते, साहेब आताच गाडी लावली होती, आमची गाडी सोडा, पोलिस, क्रेन आणि विनवणी करणारे ते दोघे असा विडियो काही नागरिक बनवून लागले. काहीनी फोटो देखील काढले. हे पाहून पोलिसांनी लगेच गाडी खाली घेऊन सोडून दिली.