Home » या देशाने 70 वर्ष एक प्रधानमंत्री येण्याची वाट पाहिली -अक्षय कुमार
Articles Entertainment खास किस्से

या देशाने 70 वर्ष एक प्रधानमंत्री येण्याची वाट पाहिली -अक्षय कुमार

माझं नाव अक्षय कुमार आहे. मी एक विनोदी कलाकार आहे, मी साहसी चित्रपट देखील करतो. मी रोमॅंटिक चित्रपट देखील करतो. सिनेमा हे मनोरंजनाचे माध्यम आहे असे मी मानतो,पण त्या बरोबरच काही चित्रपट हे मनोरंजना सोबत सत्य गोष्टी देखील समोर आणतात.

मी देखील एक चित्रपट बनविला होता, टॉयलेट एक प्रेम कथा , आपल्या देशाला एक महत्वाची गोष्ट समजायला जवळपास 70 वर्ष लागली, ती गोष्ट म्हणजे टॉयलेट ही स्त्री आणि पुरुष यांची प्राथमिक महत्वाची गरज आहे. स्त्रीयांसाठी टॉयलेट अतिशय महत्वपूर्ण आहेत.

या देशाने 70 वर्ष एक प्रधानमंत्री येण्याची वाट पाहिली , ज्याने संपूर्ण देशाला हे समजावले की शौचालय असणे किती गरजेचे आहे. आज देशांत घरा -घरात शौचालय आहेत. आज आपल्याला आपल्या देशांच्या अनेक गोष्ट समोर आणायच्या आहेत. यातील काही गोष्ट समोर आल्या आहेत, तर अनेक कहाण्या समोर आलेल्या नाहीत.

जसे की विवेक अग्निहोत्री यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपट बनवून,देशासमोर एक वेगळं सत्य समोर आणलं आहे. हा चित्रपट एक लाट बनून आला, ज्याने प्रत्येकाला विचार करायला भाग पाडलं.

दुसरी गोष्ट म्हणजे माझा चित्रपट देखील यामुळे डुबला गेला. मी सर्वांना एकच हात जोडून सांगतो, तुम्ही आयुष्यात कधीच हिंमत हारू नका, मी स्वता सलग 15 -16 फ्लॉप दिले आहेत, त्यामुळे अपयश काय आहे हे मला चांगलंच माहीत आहे. पण मी प्रयत्न करत राहिलो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.