सर्व राजकारणी दारू पितात. खासदार सुप्रिया सुळे व भाजपाच्या आमदार पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. असे एक व्यक्तव्य बंडा तात्या यांनी दिले आणि महाराष्ट्रात एकच गदारोळ झाला. बंडा तात्या त्यांच्यावर सर्व पक्षातून जोरदार टीका झाली. महिला आयोगाने त्यांना नोटीस देखील पाठविली.
त्या नंतर बंडा तात्या नरमले. त्यांनी माफी देखील मागितली. पण महिला आयोगाने हे स्पष्ट केले की त्याच्यावर कारवाई होणारच. बंडा तात्या प्रसिद्ध होण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी ते कोणत्याना कोणत्या कारणांसाठी प्रसिद्ध होत असतात. मागच्या वर्षी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पंढरपुरात येण्यास विरोध केला केले होता. त्याच बरोबर त्यांनी अनेक कंपन्याच्या विरोधातील देखील आंदोलन केले होते.

ते त्यांची भूमिका अतिशय आक्रमक मांडतातजेव्हा कोरोनाची साथ सुरू होती तेव्हा देखील बंडा तात्या यांनी राज्य सरकारला कडाडून विरोध केला होता. त्यांनी पायी वारी सुरू केली होती. त्यावेळी त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ते पंढरपूरला पायी निघाले होते तेव्हा देखील त्यांना रस्त्यामध्ये अटक करण्यात आले होते.
जेव्हा राज्यातील सर्व मंदिरे बंद होती तेव्हा देखील त्यांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला होता. त्यांनी सर्वांना विनंती केली होती की दिवाळी साजरी करू नका. यंदा देखील तुकाराम बीज साजरी करण्यासाठी त्यांनी खूप टीका केली होती. कोणत्याही स्थितीमध्ये तुकाराम बीज साजरी होणार. गुन्हे दाखल झाले तरी आमची तयारी आहे.
बंडा तात्या यांनी वेळोवेळी राज्यसरकारवर टीका केली आहे. ते म्हणतात की पुण्याची लोकसंख्या लाखोमध्ये आहे त्यातून 2-3 हजार लोकांना तर कोरोनाची लागण तर होणारच त्यात काय नवीन नाही. राज्य सरकार कोरोनाच्या नावाखाली दहशत माजवत आहे. हॉटेल, लग्न, हे सर्व काही सुरू आ हे. मग वारीला आणि गावा -गावामध्ये भणाऱ्या जत्रा यांना विरोध का? असा देखील सवाल त्यांनी विचारला होता.

एकदा राज्य सरकारने बंडा तात्या यांच्या नावाची शिफारस ही पद्मश्री पुरस्कारासाठी केली होती.त्यासाठी राज्य सरकारने त्यांची माहिती मागविली त्यांनी ती माहिती देण्यास नकार दिला. त्यांच्या मते आपण कोणतेही पुरस्कार स्वीकारत नाहीत. त्यामुळे त्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. बंडा तात्या यांचे सामाजिक काम देखील मोठे आहे. त्यांनी अनेक व्यसनाधीन केलेल्या तरुणाना बाहेर काढले आहे. तरुण पिढी व्यवसानपासून दूर रहावी यासाठी बंडा तात्या अनेक उपक्रम राबवित असतात.
वारकरी संप्रदाय यासाठी देखील ते मोठे काम करतात. त्यांना एक गुरुकुल देखील सुरू केले आहे. यांमध्यमातून ते वारकरी संप्रदयांचे शिक्षण देत आहेत. सामाजिक कामात ते नेहमी अग्रेसत असतात. बंडा तात्या यांच्यावर आता पर्यत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत पण ते सर्व गुन्हे जामीनास पात्र आहेत.