Home » हा आमच्या घरचा मुद्दा आहे, तुमचे हात- पाय किंवा नाक खुपसू नका अन्यथा, ओवैसीनी पाकला सुनावले
Articles

हा आमच्या घरचा मुद्दा आहे, तुमचे हात- पाय किंवा नाक खुपसू नका अन्यथा, ओवैसीनी पाकला सुनावले


कर्नाटकच्या उडपीमध्ये मुस्लिम मुलीनी बुरखा किंवा हिजाब घालून येण्यावर महाविद्यालयांकडून बंदी घालण्यात आली, यावरून मोठा वाद पेटला. या पार्श्वभूमीवर देशभरातून या मुद्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या विषयी देशभरातून दोन्ही बाजूनी मत मांडली जात आहेत.

पाकिस्ताने मात्र या संधीचा फायदा उठवत, भारतावर जोरदार टीका केली आहे. भारतात हा वाद पेटलेला असताना,एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना अगदी कडक शब्दांत सुनावले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ट्विट करत भारतावर जोरदार टीका केली आहे. मुस्लिम महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मानवअधिकाराचे उल्लंघन आहे.

कुणालाही शिक्षणापासून वंचित ठेवणे आणि हिजाब घातलाच पाहिजे हे जबरदस्ती आहे. भारत मुस्लिम महिलांवर जबरदस्ती करत आहे. दबाब टाकत आहे. यावर असदुद्दीन ओवैसी यांनी एका सभेत बोलत असताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत, मलालावर हल्ला पाकिस्तानमध्ये झाला होता.

पाकिस्तानच्या लोकांना सांगतो तुम्ही इकडे बघू नका, तिकडे बघा असं ओवैसी म्हणाले. तुमच्याकडे बलूचीची समस्या आहे. तुमच्याकडे अनेक वाद आहेत. तुम्ही ते पहा हा देश माझा आहे. तुमचा नाही. हा आमच्या घरचा मुद्दा आहे. तुम्ही यात आपला पाय किंवा नाक खुपसू , तुमचा पाय आणि नाक जखमी होईल. असा खोचक सल्ला देखील ओवैसी यांनी पकिस्तानला दिला आहे.