Home » यूपीमध्ये मॉडेलच्या, कॉंग्रेस उमेदवारीवरुन नवीनचं वाद सुरू झाला आहे, हे आहे कारण
Articles Celebrities Entertainment

यूपीमध्ये मॉडेलच्या, कॉंग्रेस उमेदवारीवरुन नवीनचं वाद सुरू झाला आहे, हे आहे कारण


राजकारण आणि आपला देश एक वेगळं समीकरण आहे. आपल्या देशांत इतर कोणत्याही प्रश्नापेक्षा आपल्या देशांत राजकारणाला अधिक महत्व दिलं जातं. राजकारणातील काही विषय तर कधी कधी इतके गाजतात की त्यांची संपूर्ण देशांत चर्चा होते. आता हेच पहा यूपीमध्ये एका मॉडेलला उमेदवारी दिली त्यामुळे एक नवीन वादळं उभं राहिलं आहे.

आता जो वाद आहे तो आपण समजून घेऊ, त्याचं झालं असं की उत्तर प्रदेशात निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सध्या तिथे उमेदवारी जाहीर करण्यात येत आहेत. या वेळी कॉंग्रेसने देखील उत्तर प्रदेशात चांगली कंबर कसली आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या खांद्यावर सर्व जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे आता अधिक महिला उमेदवारांना निवडणुकीत संधी मिळणार आहे.

कॉंग्रेसने लडकी हू लड सकती हू असे म्हणत अनेक महिला उमेदवार मैदानात उतरविले आहे. म्हणजेच काय आता हे पहा उत्तर प्रदेशात एकूण 135 जागा आहेत. त्यातील 40 टक्के जागांवर महिला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कॉंग्रेसने मेरठच्या हस्तिनापूर मतदारसंघातून मॉडेल आणि अभिनेत्री अर्चना गौतम यांना उमेदवारी दिली आहे.

अर्चना यांचे नाव जाहीर होताच एकच खळबळ उडाली. अर्चना एक मॉडेल आहेत. त्यामुळे त्यांचे अनेक फोटो सोशल मिडियावर व्हायरलं होऊ लागले. त्यांचे काही अभद्र भाषेचा वापर केलेले विडियो देखील व्हायरलं झाले आहेत. अर्चना गौतम यांचा जन्म 1995 साली मेरठ येथे झाला. त्यांनी आयआयएमटीमधून पत्रकारीतेचे शिक्षण घेतल्यानंतर मॉडलिंग आणि अभिनयात करियर करण्यासाठी त्यांनी मुंबईकडे वाटचाल केली.

2014 मध्ये ती मिस युपी झाली. अर्चना यांनी अनेक चित्रपटांत देखील काम केले आहे. 2015 आलेल्या ग्रेट ग्रँड मस्ती या बॉलीवुड चित्रपटांत देखील काम केले.त्या नंतर हासिना पारकर, ग्रेट ग्रँड मस्ती,बारात कंपनी, वाराणसी यारख्या अनेक चित्रपटात काम केले. 2018 मध्ये अर्चना यांना मिस बिकिणी इंडिया 2018 चा किताब देखील मिळाला आहे. त्यांना हा किताब आणि त्याचे एकूण करियर पाहता हिंदू महासभा यांनी त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध केला आहे.

हिंदू महासभेने त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. कॉँग्रेसला उद्देशून हिंदू महासभा म्हणते मानसिकदृष्ट्या दिवाळखोर झालेल्या पक्षाकडून वेगळ्या अपेक्षा करता येत नाहीत. जर एखाद्या व्यक्तीला सामाजिक जीवनात प्रवेश करायचाा असेल तर त्याने आपल्या संस्कृतीचा आदर केला पाहिजे. पण कॉंग्रेस हिंदू आणि हिंदुत्व यात फरक करते.

उद्या ते एखाद्या गुन्हेगाराला उमेदवारी देतील. मते मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाआरोप हिंदू महासभेने कॉंग्रेसवर केला आहे. अर्चना आणि देखील आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणतात, मी मिस बिकिणी 2018 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

मी अनेक ठिकाणी मीडियामध्ये काम केलं आहे पण मी लोकांना विनंती करते की मीडिया आणि मॉडलिंग हा माझा पेक्षा आहे. आता मी माझी राजकीय कारकीर्द सुरू करत आहे. हे दोन्ही एकत्र करू नका. जनतेची सेवा करण्यासाठी मी राजकारणात प्रवेश करत आहे. तुम्ही मला जिकण्यासाठी मदत करा.