बिहारमध्ये रेल्वे परीक्षेचा मुद्दा चांगला पेटला आहे. आंदोलनाला चांगलेच हिंसक वळण मिळाले आहे. 26 जानेवारीला देखील मोठा गोंधळ झाला.भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं, अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. अनेक ठिकाणी परीक्षा घोटाळा झाल्याचा आरोप होत आहेत.
गयामध्ये तर आंदोलनातील तरुणांनी एका ट्रेनवर दगडफेक करत ट्रेनला आग लावली. युट्यूबवर अतिशय प्रसिद्ध असणारे खान सर आणि त्यांच्यासह इतर 400 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या विद्यार्थीयांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
या जबाबाच्या आधारेच गुन्हा दाखल करण्यात आलाय. अटक केलेले आंदोलक विद्यार्थी हे परीक्षेला बसणार होते. या विद्यार्थीनी दिलेल्या माहिती नुसार सोशल मिडियावर व्हायरलं झालेला एक विडियो पाहून हिंसा आणि जाळपोळ केल्याची कबुली दिली आहे. या विडियोमध्ये खान सर यांनी आरआरबी एनटीपीसी परीक्षा रद्द न केल्यास विद्यार्थी रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असे वक्तव्य केले आहे.