अल्लू अर्जुन आणि रशमिका मंदना यांची प्रमुख भूमिका असलेल्या पुष्पा द राईज हा सिनेमा आणि त्यातील गाणी याने अक्षरक्षा धुमाकूळ घातला आहे. चित्रपटांतील श्रीवल्ली,सामी सामी, हे बिडा मेरा अड्डा ही गाणी प्रचंड गाजली आहेत.श्रीवल्ली हे गाणं तर सर्व भाषेत रिमेक केलं गेलं आहे.
पण मराठीतील हे गाणं अमरावतीच्या एका पठ्ठ्याने बनविलं आहे आणि ते तोडीस तोड बनलं आहे. मराठी रिमेकला तब्बल आता पर्यत 9 लाखांहून अधिक व्हीवज मिळाले आहेत.
श्री निवास स्टुडिओ अमरावती आणि आदित्य म्युझिक यांच्या साथीने हे गाणं गायलं आहे विनोदी कलाकार विजय खंडारे याने. या गाण्यांचे गीतकार देखील विजय हे आहेत. या गाण्यात विजय खंडारे सह तृप्ती खंडारे यांच्यासह राधिका नागरमोटे, रोशनी चौधरी, मनीष पटांगरे, सुहासिनी गुलहाने याची साथ लाभली आहे.
विजय हा मूळचा अमरावती जवळील तिवसा या गावचा आहे. तो कामानिमित्त अमरावती शहरात राहतो.त्याने देशमुख कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
त्यालाअगदी बालपणी पासून अभिनयाची आवड आहे.यातून त्याने स्वताचे असे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्यांच्या या चॅनलवर त्याने वऱ्हाडी भाषेतील विनोदी विडियो बनवून टाकले आहेत. त्यांच्या यूट्यूब चॅनलचे 1 लाख 75 हजार अधिक सबस्क्राईब केलं आहेत. विशेष म्हणजे त्याने हे संपूर्ण गाणं मोबाइलमध्ये शूट केलं आहे.