सध्या अनेक सुपरस्टार चर्चेत आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून लाखों रुपये कमावत आहेत. यातीलच एक प्रसिद्ध यूट्यूबर म्हणजे विनायक माळी होय. विनायक आपल्या आगरी भाषेतील विनोदी विडियोमुळे चर्चेत असतो. विनायक यांच्या विडियोला मिलियनमध्ये व्यूह असतात.
विनायकने नुकतीच एक आलिशान गाडी विकत घेतली आहे. विनायकने मर्सिडीज बेंझ सी क्लास ही अलिशान गाडी खरेदी केली. या नवीन कारचा एक विडियो त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
त्याने या पोस्टला घेतली एकदाची असं कॅपशन देखील दिलं आहे. त्यांच्या या महागड्या गाडीची किंमत तब्बल 62 लाख इतकी आहे. विनायक खऱ्या आयुष्यात देखील आता शेठ माणूस बनला आहे.
तो त्यांच्या यूट्यूब विडियो मध्ये स्वताला शेठ म्हणवून घेत असतो. विनायक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्यांचे वडील सरकारी नोकरी करतात. त्यांचे हे यश नक्कीच कौतुकास पात्र आहे.
विनायकने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. आधी त्याने हिंदी भाषेत काही विडियो बनविले पण त्याला त्यामध्ये काही अपेक्षित यश मिळाले नाही. त्या नंतर त्याने कोळी भाषेत विडियो बनविण्यास सुरुवात केली.
विनायक आता यूट्यूबवरील एक प्रसिद्ध असा यूट्यूबर आहे. त्यांचे हलके-फुलके विडियो अनेकांना आवडतात. अनेक वर्षांपासून त्याने यासाठी मेहनत घेतलेली आहे.