Home » विराट कोहली पितो काळं पाणी, पाण्याची किंमत वाचून बसेल धक्का
Articles झाल कि व्हायरल!

विराट कोहली पितो काळं पाणी, पाण्याची किंमत वाचून बसेल धक्का


आजकाल प्रत्येकजण स्वताच्या आरोग्याची काळजी घेतो. कोणी व्यायाम करतं, कोणी चांगलं चुगलं खातं, कोणी धावायला जातं पण प्रत्येकजण स्वताला शक्य होईल तितकी स्वताची काळजी घेतो. फक्त डाएट करून चालतं नाही, किंवा फक्त व्यायाम करून चालत नाही. दोन्हीची देखील उत्तम सांगड घालावी लागते तेव्हाच आपण हेल्दी जगू शकत नाही. जेव्हा आपण एखादा अभिनेता, अभिनेत्री किंवा क्रिकेटर यांना पाहतो तेव्हा आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो.

कारण त्यांची फिगर आपल्याला आवडते . त्यांच्या महागड्या जीम्स, त्यांचे डाईट हा नेहमी चर्चेचा विषय असतो. सेलिब्रिटी त्यांच्या जीम आणि डाएटवर लाखों रुपये खर्च करतात पण सर्वसामान्य नागरिकांना हे शक्य होत नाही. आता पर्यत सेलिब्रिटी आणि सर्वसामान्य नागरिक अगदी सारखे पाणी पित असतं पण आता मोठे सेलिब्रिटी आणि खेळाडू मात्र वेगळे पाणी पित आहे. अनेकदा विराटच्या हातात अनेकदा ब्लॅक वॉटर दिसत आहे. ब्लॅक वॉटर म्हणजे काळं पाणी होयं. हे ब्लॅक वॉटर दिसायला काळं पाणी असलं तरी यांची किंमत लाखोंमध्ये आहेत.

आज आपण या प्रसिद्ध अशा ब्लॅक वॉटर विषयी जाणून घेणार आहोत. विराट कोहली आणि इतर सेलेब्रिटी पित असलेले ब्लॅक वॉटर हे एक विशेष पाणी आहे. फ्यूलविक अॅसिड काही इतर खनिज तत्व आणि जीवनसत्व असतात. या पाण्याला हेल्थ ड्रिंक नॅच्युरल अल्काईन ड्रिंक, फ्ल्यूलवीक ड्रिंक आणि स्पोर्टस ड्रिंक असंही म्हटलं जातं.

या पाण्यामुळे तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी नीट राहते.यामध्ये फ्ल्यूवीक अॅसिड आणि इतर खनिजे असतात. अनेक जीवनस्त्वे देखील असतात. या पाण्याची पीएच पातळी देखील बरीच असते. आपण जे पाणी पितो तेव्हा पीएच पातळी साधारण 6.5 ते 7.5 इतकी असते. सध्या पाण्यातील ही पातळी हवामान, पाणी कुठून आणलेलं आहे.

पाण्यातील जंतु मारण्यासाठी ते फिल्टर वापरलं आहे का हे देखील तपासलं जातं. ब्लॅक वॉटर मधील पीएच पातळी 7.5 पेक्षा जास्त असते. ब्लॅक वॉटर हे सर्वाधिक शुद्ध पाणी समजलं जातं. याची पीएच पातळी जास्त असल्यामुळे हे पाणी त्वचेसाठी शुद्ध असतं. यामुळे रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.

ही पीएच पातळी 7.5 पेक्षा जास्त असल्यामुळे आपल्याला इतर औषधे देखील घ्यावी लागत नाहीत.या पाण्याचे नाना फायदे आहेत. या पाण्यामुळे आपलं वजन देखील आटोक्यात राहायला मदत होते. या पाण्यामुळे नैराश्याशी देखील येत नाही. ज्यांना हाय बीपी, मधुमेह असे त्रास आहेत, ज्यांच्या शरीरात अतिरिक्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल असतं.

त्यांनाही हे पाणी प्यायल्यामुळे फायदा होतो. या पाण्यातले कण हे लहान असल्यामुळे पेशी अगदी सहज शोषून घेता येतात. आपण अन्न खाल्यानंतर या पाण्यामुळे त्यातील पोषकद्रव्ये शोषली जातात.या पाण्याची किंमत तुम्हाला वाचून तुम्हाला धक्का बसेल,1 लीटर पाणी 20 ते 30 रुपयांत मिळेल पण ब्लॅक वॉटरची किंमत हजारांच्या घरात आहे.

या ब्लॅक वॉटरची किंमत 3000 ते 4000 हजार इतकी आहे. आज काल अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर आणखी ब्लॅक वॉटर किंमत 90 रुपये इतकी आहे. विराट कोहली 2018 पासून हे पाणी पितो, मलायका अरोरा देखील हेच पाणी पिते.