द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे काश्मिरी पंडितांचा मुद्दा समोर आला आहे. 1990 मध्ये नेमकं काय घडलं हा प्रश्न सर्वांना पडला आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. या चित्रपटांतील स्टार कास्ट देखील तितकीच तगडी अनुपम खेर,पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती आणि इतर अनेक कलाकारांनी अभिनय उत्तम केला आहे.
या चित्रपटांमुळे राजकारण चांगले तापले आहे. कॉंग्रेसने भाजपावर टीकेची उठविली आहे. शिवसेनेने मात्र वेगळाच मुद्दा समोर आणला आहे. सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काश्मिरी पंडितांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओ एक काश्मिरी पंडित युवक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आभार मानत आहे.
This. #KashmiriPandits . Not about politics but about justice. pic.twitter.com/Z8oUB3GcEX
— Priyanka Chaturvedi?? (@priyankac19) March 13, 2022
काही गोष्टी लोकांच्या समोर आल्या नाहीत. राजकीय भाषेत बोलायचं झालं तर त्या वेळेस कोणतं सरकारचं नव्हतं. त्यावेळी काश्मीरमध्ये वेगळी परिस्थिती होती, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. तेव्हा राज्यपाल यांच्याकडे देखील कोणता पर्याय नव्हता. आम्हाला जम्मूत स्थलांतरित केलं गेलं. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे आभारी आहोत त्याच्यामुळे आम्हाला महाराष्ट्रात शिक्षण घेता आलं.
आज त्याच्यामुळे कित्येक काश्मिरी ब्राम्हण इंजिनिअर आहेत. बाळसाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिक्षणामध्ये आरक्षण दिलं त्यामुळे हे सर्व शक्य झालं.