सोमवारी दिवसभर एकाच व्यक्तीची चर्चा होती. ती व्यक्ती म्हणजे 125 वर्षीय योग गुरु स्वामी शिवानंद. योग क्षेत्रातील त्यांच्या योगदाना बद्दल त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार दिला गेला. स्वामी शिवानंद यांना योग सेवक म्हणून ओळखलं जातं.
स्वामी शिवानंद राष्ट्रपती आणि प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर नतमस्तक झाले तेव्हा संपूर्ण देश भावुक झाला होता. स्वामी शिवानंद तीन दशकाहून अधिक काळ काशीच्या घाटावर योग अभ्यास करत आहेत, तसेच शिकवत देखील आहेत. विनम्रता हा त्यांचा सर्वात मोठा गुण आहे. आता पर्यत जितके पद्मश्री दिले गेले त्यातील सर्वाधिक वय असलेले पद्मश्री म्हणून स्वामी शिवानंद यांची नोंद झाली आहे.
भारतीय राष्ट्रपती कार्यालयाने ट्विटरवर योग सेवक यांच्या सोबतचा फोटो शेअर केला. स्वामी शिवानंद यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वताच्या जागेवरून उठून आले. स्वामी शिवानंद यांनी मंचांकडे येताना आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडवत घातले.
स्वामी शिवानंद यांचा मूळ जन्म बंगालमध्ये झाला. 1896 मध्ये झाला. ते सहा वर्षांचे असताना त्यांचे आई- वडील आणि बहीण यांचा देखील मृत्यु झाला. ते त्या नंतर काशीला आले. तेथे ओकांरनंद यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. ते 29 वर्षांचे असताना लंडनला गेले. वय 34 होईपर्यत ते जग फिरत राहिले. त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन योग प्रसारासाठी खर्च केले.