Home » मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार का घेतला? भाजपाच्या आरोपांना प्रतिउत्तरे का दिली नाहीत
Articles आपलं राजकारण झाल कि व्हायरल!

मुख्यमंत्र्यांनी भावनिक भाषणाचा आधार का घेतला? भाजपाच्या आरोपांना प्रतिउत्तरे का दिली नाहीत

मुख्यमंत्री केलेल्या आरोपांना प्रतिउत्तरे देत नाहीत, ते फक्त भावनिक भाषणे करतात. असा आरोप विरोधी पक्ष भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत काल तासभर भाषण केले. पण त्यांनी विरोधकांचे मुद्दे न खोडता,त्यांनी भावनिक भाषण केले.

आम्ही पुराव्यानिशी मुद्दे मांडले, पण उद्धव ठाकरे यांनी आमच्या कोणत्याच प्रश्नाचे उत्तर दिले नाही. हे भाषण विधान सभेसाठी नव्हतं तर शिवाजी पार्कसाठी होतं असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत सलग दोन दिवस भाषण केले.

पहिल्या दिवशी त्यांनी फक्त महाविकास आघाडीच्या विकास कामाचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी तर चक्क त्यांनी भावनिक भाषण करून विषय संपवला. विरोधक मागील एक महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या मागे लागले आहेत. अनेक आरोप आणि पुरावे समोर येत आहेत. काही दिवसांपासून तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबावर देखील अनेक आरोप झालेत.

भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हे भावनिक भाषण बिलकुल पटलेले नाही. त्यांनी सरळ सभा त्याग केला. उद्धव ठाकरे असे का वागत आहेत, असा प्रश्न विरोधक विचारत आहे? ते भावनिक भाषणाचा आधार का घेत आहेत? उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाच्या मागे मागील दोन महिन्यांपसून विरोधक लागले आहेत.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी असे भाषण केले तसेच शिवसेना हा भावनिक खेळ खेळणारा पक्ष आहे, असे देखील म्हटले जाते. या बरोबरच मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी असे भावनिक भाषण केले. असे राजकीय अभ्यासक म्हणतात.