Home » रक्तचंदन भारताचे लाल सोने, ज्यासाठी चीन वेडा आहे..
Articles आरोग्य काय चाललंय?

रक्तचंदन भारताचे लाल सोने, ज्यासाठी चीन वेडा आहे..

माणूस आणि चित्रपट एक वेगळंच नातं आहे. कधी कोणता सिनेमा येतो आणि प्रेक्षकांना तो वेड लावून जातो हे सांगता येत नाही. असाच एक सिनेमा सध्या धुमाकूळ घालीत आहे. हा सिनेमा आहे पुष्पा. अल्लू अर्जुनने या सिनेमात तस्करी करणारा ड्राइव्हर आहे. सुरुवातीला तो एक साधा मजूर दाखविला आहे, पुढे जाऊन तो एक माफिया बनलेला असतो. या चित्रपटांत एक नाव ती वनस्पती प्रचंड गाजली ती म्हणजे रक्तचंदन होय. याआधी चंदनाचे अनेक उपयोग, त्यांची महती आपल्याला माहीत आहे.

चंदन महाग येते,बाजारात चंदनाची पाऊडर देखील मिळते,चंदनाचे अनेक उपयोग आपल्याला माहीत आहेत .त्यामुळे आता तुम्ही विचार कराल रक्त चंदन म्हणजे काय. त्याला इतकी मागणी का आहे? सर्वात प्रथम आपण रक्तचंदन काय आहे ते जाणून घेऊया.

रक्तचंदन ही चंदनाप्रमाणे असलेली वनस्पती आहे. रक्तचंदन हे लाल रंगाचे असते त्यामुळे त्याला रक्तचंदन म्हणतात. ज्या प्रमाणे सामान्य चंदनाला एक प्रकारचा सुवास असतो, त्यावरून आपण हे चंदन आहे हे ओळखतो. पण आता तुम्ही विचार कराल रक्त चंदनाला किती सुवास असेल. रक्तचंदनाला कोणताचं सुवास नसतो.

तुम्हाला हे माहीत आहे क? रक्तचंदनाला लाल सोने देखील म्हटले जाते कारण,या चंदनाला सोन्यायाप्रमाणे भाव आहे. भारतात रक्तचंदन फक्त दक्षिणेतील राज्यात मिळते. तमिळनाडू,तेलंगणा,कर्नाटक इत्यादि राज्यात मिळते. हे रक्त चंदन घनदाट जंगलात सापडते. रक्त चंदनाचे नाव टेरोकापर्स सैन्टन्स आहे. तसेच या झाडाला सैटलम देखील म्हटलं जातं.

सामान्य चंदनाचा वापर हा अनेक औषधे बनविण्यासाठी होतो.जसे की अत्तर, पाऊडर, पण रक्तचंदनाचा वापर हा महागदे फर्निचर बनविण्यासाठी होतो. रक्तचंदनाला परदेशांत तब्बल 3000 हजार रुपये इतका भाव मिळतो.आंध्रप्रदेशांतील चित्तूर,कडप्पा,कुरूनुल, आणि नेल्लोर जवळ शेषाचलम जंगलात हे रक्तचंदन मिळते.

दारू बनविण्यासाठी देखील रक्तचंदन वापरले जाते. चीनी लोकांना रक्तचंदन फार आवडते. तिकडे रक्तचंदनापासून बनविलेले फर्निचर देखील मोठ्या प्रमाणात वापरले जाते. प्राचीन जे राजवडे आणि महाल आहेत तेथे देखील रक्तचंदन वापरले जात होते.

चीन अजून देखील भारताकडून रक्तचंदनाची मागणी आहे. रक्तचंदनाचे झाड आठ ते अकरा मीटर इतके वाढते. हे झाड वाढण्यासाठी फार वेळ लागतो. कारण या झाडांची वाढ ही भरवी असते. त्यांची वाढ जरी हळू असले तरी त्यांचे वजन खूप अधिक असते. आजकाल बाजारात अनेक गोष्ट रक्तचंदन म्हणून विकल्या जातात.

आता हेच पहा खरे रक्तचंदन कसे ओळखायचे आहेत. रक्तचंदन जेव्हा पाण्यात सोडले जाते तेव्हा ते पाण्यात पूर्णपणे डुबून जाते कारण त्यांचे वजन अधिक असते.त्यांची घनता अधिक असते. त्यामुळे रक्तचंदन कधीच पाण्यावर टाकले जात नाही. रक्तचंदनाला ना कोणता सुवास असतो.रक्तचंदन अतिशय मजबूत असते. इतर झाडे पाण्यावर तरंगतात मात्र रक्तचंदन पाण्यावर तरंगत नाही. आपल्या देशातून चीन, सिंगापूर,जपान आणि ,ऑस्ट्रेलिया या देशांत रक्त चंदनाला मागणी आहे.

पूर्वी रक्तचंदनाला पूर्वी जपानमध्ये फार मागणी होती कारण तेथे लग्नंमध्ये रक्तचंदनापासून बनविलेली वाद्ये लग्नात भेट दिली जात. आता ही प्रथा कमी होत चाललेली आहे.असे देखील समोर आले आहे रक्तचंदनामुळे डोकेदुखी, पित्त, ताप, विंचू दंश इत्यादी आजारांवर हे रक्त चंदन उपयुक्त आहे. सर्वाधिक रक्त चंदनाची झाडे ही कर्नाटक राज्यात आढळून येतात.कुप्रसिद्ध डाकू विरपन्न देखील या रक्त चंदनाची तस्करी करायचा.