मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाच्या अनेक केसेस सापडू लागल्या. आणि अचानक संपूर्ण देशात लॉक डाऊन झाले. लॉक डाऊन झाले आणि सगळ्यांचे काम टप्प झाले. शेतकरी देखील मोठ्या अडचणीत सापडेल. कारण त्यांचा भाजीपाला आणि फळे आजूबाजूच्या शहरात विक्रीसाठी जात.
लॉक डाऊन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाजी आणि फळे पडून राहू लागले. त्यामुळे मोठे नुकसान होऊ लागले. तेव्हा शेतकरी चिंतेत पडू लागले. आता काय करायचे. मग काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूसर कंपनी सूरु केली. जुन्नर येथील 11 शेतकऱ्यांनी येऊन तंत्रज्ञानचा वापर करत थेट ग्राहक जोडले आणि 6.6 करोंड रुपये कमावले.

2020मध्ये जेव्हा लॉक झाले तेव्हा 11 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन व्हॉट अॅप ग्रुप बनविला आणि त्यांच्याकडे असलेला माल त्यावर ते टाकू लागले. त्या नंतर त्यांच्या मालाची फेसबुक, व्हॉट अॅप या सोशल मध्यमांवर विक्री सुरू केली. 11 शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा ग्रुप आता 480 हून अधिक शेतकऱ्यांना जोडणारा ग्रुप बनला आहे.
या सर्व शेतकऱ्यांनी मिळून किसान कनेक्ट नावाची स्वताची कंपनी सुरू केली. या कंपनीच्या माध्यमातून ते शेतकरी ते ग्राहक अशी विक्री करतात.स्वता कष्ट करून उभे केलेले पीक स्वता थेट ग्राहकांना विकत आहेत. यातून त्यांना उत्तम मोबदला तर मिळतोच त्या बरोबरच एक वेगळेच समाधान देखील मिळते. जुन्नर येथील मनीष मोरे यांनी ही संकल्पना मांडली आणि त्यांना त्यांच्या शेतकरी मित्रांनी साथ दिली.

मनीष यांनी बीएसी आणि त्यानंतर एमबीए इन अग्रिकलचर केले आहे. त्या बरोबरच त्यांनी रिलायन्स आणि बिग बाजार यांच्या सोबत देखील काम केले होते. त्यामुळे मनीष यांना मार्केटचा उत्तम अंदाज होता. मनीष यांनी 2008 साली नोकरी सोडून शेती करण्यास सुरुवात केली होती. पण त्यांना मार्केटचा अंदाज होता. मनीष यांना मात्र नेहमी वाटायचे की शेतकऱ्यांनी स्वताचा माल स्वताच विकायला हवा.
मनीष यांनी मागच्या वर्षी एप्रिल महिन्यांत त्यांच्या ओळखीतून मुंबई आणि पुणे येथील सोसायटीमध्ये त्यांचा माल विकण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांनी 100 हून अधिक सोसायट्यामध्ये माल विकू लागले. व्हॉट अॅपच्या माध्यमातून त्यांना ऑर्डर मिळू लागल्या. ते भाजी आणि फळे यांचे कीट बनवत. जसे की दोन पालेभाज्या, लिंबू,कोथिंबीर, आलं, लसूण अशा प्रकारचे कॉम्बो कीटस बनवत. वेजिटेबल बास्केट, फ्रूट बास्केट.
या बरोबरच ग्राहक जशी मागणी करतील तसे कीट देखील ते बनवत. नंतर आम्हाला ऑर्डर घेणे शक्य होत नसे कारण, ऑर्डर खूप येत होत्या. कारण आम्ही एकदा तुम्ही ऑर्डर केली की ती तुम्हाला 24 तासांच्या मिळते. त्यामुळे आम्हाला अनेक ऑर्डर मिळू लागल्या. व्हॉट अॅपवर इतक्या ऑर्डर घेणे शक्य नव्हते.
त्यामुळे आम्ही काही मित्रांच्या मदतीने एक वेबसाईट बनवून घेतली. असे मनीष सांगतात. आता पुढील येणाऱ्या काळात अॅप देखील बनविणार आहे.