Home » ७२ दुष्काळात अमेरीकेच्या लाल ज्वारीवर दिवस काढणारा भारत आता गहू निर्यात करतोय
बळीराजा

७२ दुष्काळात अमेरीकेच्या लाल ज्वारीवर दिवस काढणारा भारत आता गहू निर्यात करतोय

जेव्हा दुष्काळ पडतो, तेव्हा माणसं, जनावरं या सगळ्यांचे हाल होतात. दुष्काळ पडतो तेव्हा मुख्यत्वे अन्नधान्यांची टंचाई होते. १९७२ साली असाच दुष्काळ पडला, आता जे लोक ६० वर्षांच्या पर्यत आहेत, त्यांना हा दुष्काळ काय होता ते चांगले आठवत आहे. अन्न धान्याची आणि पाण्याची इतकी टंचाई होती की जनावारांना देखील जंगलात सोडून दिले होते.

देशांत धान्य नव्हते आणि बाहेरून धान्य मागविण्यासाठी पुरेसे चलन देखील नव्हते. अमेरिकेतून मेलो गहु आणि ज्वारी मागविली जात. मेलो लाल रंगाचा असत. अतिशय हलक्या दर्जाची ज्वारी आणि गहू होता. अमेरिकेत तो जनावरांना खाण्यासाठी वापर तो आपल्या देशांत नागरिकांना खाण्यासाठी दिला जात.

आता २०२२ आणि भारत आणि जगातील एक मोठा धान्य निर्यात करणारा देश बनला आहे. संपूर्ण जगाचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे की जगत अनेक ठिकाणी युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अन्न सुरक्षा लक्षात घेऊन भारताने गव्हाची निर्यात थांबविली आहे.

आज अन्नपूर्ण असलेल्या भारतावर १९७२ साली अशी वेळ आली होती की अमेरिकेत डुकरांना आणि जनावारांना खाऊ घालणारे मेलो खाऊन जगत होते. त्यामुळे आता जरी आपण अन्नपूर्ण असलो तरी अन्नाची किंमत करायलाच हवी. कारण अन्न हे पूर्णब्रह्म आहे. १९७२ दुष्काळाची आता जरी आठवण काढली तरी अनेक भारतीयांच्या डोळ्यात पाणी येतो. मेलो आणि सुकडी डोळ्यासमोर जात नाही. गहू निर्यात करणारा भारत एकेकाळी अमेरिकेच्या मेलोवर जगत होता.