सध्याची तरुण पिढी दिवसभर सोशल माध्यमांवर रील्स बघण्यामध्ये व्यस्त असते, पण एका शेतकऱ्यांच्या पोरांने युट्यूब आणि गुगलच्या माध्यमातून माहिती मिळवून झुकीनी (Zucchini) या परदेशी भाजीचे उत्पन्न घेतले आहे. यातून त्याने उत्तम पैसे कमावले आहेत.
जुन्नर (Junnar) तालुक्यातील उदापुरच्या समीर शिंदे (Sameer Shinde) याने पारंपारिक शेती न करता एक वेगळा मार्ग निवडला आहे. समीरचे वडील खंडेराव हे देखील शेती करतात, समीरने देखील शेती करण्याचा निर्णय घेतला. त्याने पारंपारिक पिके न घेता, नवीन पीक घेण्याचे ठरविले. त्याने वर्षभर इंटरनेटवर सर्व पिकांची माहिती घेतली. त्यांचा सखोल अभ्यास केला. त्या नंतर त्याने झुकीनीचे पीक घेण्याचे ठरविले.
झुकीनी ही एक परदेशी फळभाजी आहे. समीरला मशागती पासून ते काढणी पर्यत 16 हजार रुपये खर्च आला. पहिल्या काढणी नंतर तब्बल 18 हजार रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. समीरचे स्वताचे एस. के . एस अग्रिकल्चर हे बी- बियाणे यांचे दुकान आहे. यांच्या माध्यमातून त्यांनी हे झुकीनीचे पीक घेतले आहे.
3 रुपये या प्रमाणे एक झुकीनीचे झाड समीर यांनी विकत घेतले. 1200 बियांची त्यांनी लागवड केली. योग्य सिंचन, योग्य काळजी यामुळे झुकीनीचे उत्तम पीक आले. 33 दिवसांमध्ये पीक काढणीला येते. पहिल्या टप्यामध्ये तब्बल 20 किलो फळ मिळाले. चार मे पर्यत तब्बल 650 किलो उत्पादन मिळाले. 30 रुपये ते 80 रुपये इतका दर देखील मिळाला. आता जून पर्यत उत्पादन मिळत राहणार आहे. झुकीनीने हे पीक सर्वप्रथम इटलीमध्ये घेतले गेले. त्या नंतर त्यांचा प्रसार अमेरिका आणि युरोपात झाला.