बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत ज्या काही मराठमोळ्या नायिका आहेत त्यात सोनाली बेंद्रेच नाव आजही आदर्श घेतल जात.सोनालीच्या सौंदर्याची तारीफ करावी तितकी थोडी आहे.

सोनालीने अनेक हिट चित्रपट दिले असून अनेक नायकांसोबत काम केलेल आहे.सुंदर रुपासोबत सुंदर व्यक्तिमत्त्व असजलेल्या सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या आजारावर मात केली आहे. स्वताच्या इच्छाशक्तीने व चाहत्यांच्या प्रेरणेने हे शक्य होऊ शकल अस प्रांजळपणे तिने कबूल केल आहे.न्यूयॉर्कमध्ये तिच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले.

सुनील शेट्टीच अव्यक्त प्रेम
बॉलीवूडमध्ये मॅचमेकींग सातत्याने सुरू असते परंतु सोनालीचे मात्र फारसे अफेअर गॉसिप पुढे आले नाहीत.सोनालीन नुकतच उघड केल की, रफ अँड टफ असलेल्या अॅक्शन हिरो सुनिल शेट्टीवर ती प्रेम करत होती.स्वताची अॅक्शन आणि स्टाईलसाठी प्रसिध्द असलेला सुनिल शेट्टी सध्या लाइमलाईटपासून दूरच असतो.नव्वदच्या दशकात त्याने अनेक हिट चित्रपट दिले ज्यात मोहरा या चित्रपटाचा समावेश होतो.याच सुनीलने मराठमोळ्या सोनालीचे दिल चोरले होते.

या दोघांनी अनेक हिट चित्रपट एकत्र केले होते ज्यात सुचत, भाई, कहर यांचा समावेश होतो. या चित्रपटांच्या चित्रिकरणादरम्यान सुनील शेट्टीचही सोनालीवर प्रेम जडल होत,परंतु तो विवाहित असल्याने कधीही स्वताचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त करू शकला नाही.

सध्या दोघेही आहेत विवाहित
सोनाली बेंद्रेने गोल्डी बहल नामक फिल्ममेकरशी विवाह केला असून त्याचा लंडन, पॅरिस,न्यूयॉर्क हा चित्रपट गाजला होता.सोनालीनेही विवाहानंतर चित्रपटात काम करणबंद केल आहे.सुनिल शेट्टी एक उत्तम कलाकार असण्याबरोबरच हॉटेल व्यावसायिक आहे, तसेच त्याचे वैवाहिक आयुष्यही सफल राहिले आहे.अहान व अथिया अशी दोन अपत्य त्याला असून अथियाने हिरो चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे.
Add Comment