Home » चक्क स्पेस मध्ये शूट होणार टॉम क्रुज चा ‘हा’ चित्रपट, वाचा अस काय आहे या चित्रपटात?
Entertainment Movies मायानगरी

चक्क स्पेस मध्ये शूट होणार टॉम क्रुज चा ‘हा’ चित्रपट, वाचा अस काय आहे या चित्रपटात?

हॉलीवूड स्टार टॉम क्रुज त्याच्या Mission impossible चित्रपटाच्या सिरीजमुळे जगभरात लोकप्रिय आहे. वयाच्या ५४ व्या वर्षीसुद्धा तो हॉट आणि हिट अ‍ॅक्टर म्हणून ओळखला जातो. भारतात ‘चिकना नट’ अशी ओळख असणारा टॉम क्रुज नेहमी चित्रपटाच वेगळ कथानक आणि खर्च यामुळे चर्चेत असतो.

सध्या जगभरात कोरोनो वायरसमुळे लॉकडाऊन सुरू असताना अमेरिकेत लॉकडाऊनला विरोध होत आहे, परिणामीअमेरिकेत या साथीचा फैलाव वेगाने पसरत असून मृत्यू दर वाढत आहे. बेकारी वाढत आहे. अमेरिकेला या रोगाच्या महामारीचा फटका सगळयाच दृष्टीने बसत असतानाच टॉम क्रुजने मात्र त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा करून धमाका केला आहे. टॉम क्रुजच्या या नव्या चित्रपटाची चर्चा मीडियात सनसनाटी निर्माण करत आहे.

अस काय आहे या चित्रपटात?

टॉम क्रुजच्या या नव्या चित्रपटाच कथानक अंतराळात घडत असून चित्रपटाच शूटींग स्पेसमध्ये होणार आहे. या पूर्वीही अशा कथानकाचे चित्रपट हॉलिवूडमध्ये तयार झालेले आहेत. हे चित्रपट जगभरात तुफान चाललेले आहेत, मात्र टॉम क्रुज टचचे वेगळेपण त्याच्या चित्रपटात दिसणार यात शंका नाही. या चित्रपटासाठी टॉम क्रुजने नासा स्पेस सेंटर आणि प्रसिद्ध उद्योगपती, टेस्ला कारचे निर्माते इलोन मस्क यांच्याशी करार केला आहे.