आपल्या हिंदी चित्रपटांमध्ये डॅनी ने केलेल्या अनेक खलनायकांच्या भूमिका तुम्ही पहिल्या असतील. त्यांच्या रोल मुळे ते शेवटपर्यंत बॉलीवूडचा एक ‘सुपर व्हिलन’ राहिले आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये येण्याअगोदर त्यांनी हिंदी आणि नेपाली भाषेत गायचे काम केले होते. डॅनी मुळचे नेपाळ चे असूनही त्यांनी हिंदी भाषेवर आपली चांगली पकड ठेवली होती. सुरुवातीपासूनच, त्यांच्या भाषेवरील या प्रभूत्वामुळेच त्याला अनेक वेळा रेडीओ कडूनही बरेच कामे मिळाली आहे.
जेव्हा भारतीय चित्रपटांमध्ये त्यांना कामे मिळू लागली त्यानंतर त्यांनी रेडिओ आणि गान दोन्ही सोडलं आणि बॉलीवूडचा रस्ता धरला. खुदा गवाह, चायना गेट, इंडियन हे डॅनीचे खूप जबरदस्त चित्रपट मानले जातात. यामध्ये त्यांनी स्वतःच्या अभिनयाची ओळख मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना दिली. त्यांच्या या अभिनयाला लोकांनी देखील भरभरून दाद दिली.
तस पाहिलं तर डॅनी च कुटुंब चांगल चांगल मोठ आहे. त्यांना दोन मुले आहेत आणि एक मुलगी आहे. डॅनी ची मुलगी पेमा डेन्झोंगपा तिच्या दिसण्याच्या बाबतीत हुबेहूब वडिलांवर गेली आहे. सिक्कीम मध्ये जन्मलेली पेमा एखाद्या बार्बी डॉल सारखीच दिसते. आणि आत्ता ती सुद्धा तीच करियर घडवण्यात मग्न दिसते.
पेमाच शिक्षण लंडन व मुंबई स्कूल ऑफ कम्युनिकेशनमधून झालेले समजते. आणि पुढे तिने बी.ए. ची पदवी देखील घेतलीये. पेमा म्हणते तिला तिच्या वडिलांप्रमाणे चित्रपटात काम नाही करायचं. तीला एक चांगली व्यवसाईक म्हणून जीवन जगायला आवडेल अस तीच मत आहे.
डॅनीचा मुलगा गावा हा देखील चित्रपटात जाण्यास अजिबात इच्छुक नाहीये, त्याची सुद्धा व्यवसाईक म्हणून करिअर घडविण्याची इच्छा आहे. प्रत्त्येक चांगल्या वडिलांप्रमाणे डॅनी यांनाही आपल्या मुलांचे निर्णय आवडतात. आणि त्यासाठी त्यांना ते सपोर्ट देखील करतात. चित्रपटात जाण्यासाठी डॅनी यांनी कधीही त्यांच्या मुलांना दबाव दिला नाही. पेमा दिसायला कुठल्याही बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नसली तरीही तिच्या निर्णयावर तिच्या वडिलांना नेहमी अभिमान वाटत राहिलाय. डॅनी आजही बॉलीवूडमध्ये ऍक्टिव्ह आहेत. आत्ताच त्यांनी कंगना रनौत सोबत मनीकर्णिका चित्रपटात एक महत्वाची भूमिका देखील केली आहे.
Add Comment