Home » २१ वर्षे मोठ्या संजय दत्त सोबत कस जडल मान्यताचे प्रेम? वाचा ‘ती’ रंजक लव्ह स्टोरी
Celebrities Entertainment खास किस्से

२१ वर्षे मोठ्या संजय दत्त सोबत कस जडल मान्यताचे प्रेम? वाचा ‘ती’ रंजक लव्ह स्टोरी

संजय दत्तची कारकिर्द नेहमीच वादग्रस्त आणि रंजक राहिलेली आहे. संजय दत्ताची पत्नी मान्यता संजयपेक्षा 21वर्षांनी लहान आहे. मान्यता दत्त कधीकाळी बॉलीवूडमध्ये नशीब आजमावायला आली होती, परंतु तिला हिट चित्रपट मिळू शकले नाहीत.

बी ग्रेड चित्रपटात काम करून ती एका हिटच्या शोधात होती,परंतु मान्यताला अभिनयाची संधी न मिळता प्रकाश झा यांच्या गंगाजल चित्रपटात ‘अल्हड जवानी’ नामक आयटम साँग करण्याची संधी मिळाली. हे गाण सुपरहिट ठरले. या गाण्यानंतरसुध्दा मान्यताला फारसे चित्रपट मिळू शकले नाहीत, परिणामी ती बी ग्रेडचे चित्रपट करत राहिली. या बी ग्रेड सिनेमांमुळेच ती संजय दत्तच्या समीप आली. नुकताच स्वताचा 42वा वाढदिवस तिनी साजरा केला.

काय आहे मान्यता संजयची लव्ह स्टोरी?

मान्यताला सफल अभिनेत्री बनण्यासाठी एका हिट चित्रपटाची गरज होती परंतु असा चित्रपट तिच्या वाणीला येत नव्हता.परिणामी ती बी ग्रेड सिनेमात काम करू लागली, त्यातूनच तिला ‘लवर्स लाईक’असा सिनेमा मिळाला.या चित्रपटाचे हक्क संजय दत्तने 20लाखात खरेदी केले आणि दोघांत भेटीगाठी सुरू झाल्या.मान्यता संजयच्या प्रेमात आकंठ बुडाली,ती त्याला आपले ह्रदय देऊन बसली.मान्यता संजयपेक्षा 21वर्षांनी लहान असून याच कारणास्तव संजयच्या कुटुंबियांचा या विवाहाला विरोध होता.संजयच्या पहिल्या पत्नीची मुलगी त्रिशाला 31वर्षांची आहे.परंतु प्रेमात वयाचा अडसर ठरला नाही आणि दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला.7फेब्रु2008रोजी दोघांनी लग्न केल.

दोघांच वैवाहिक आयुष्य

मान्यता आणि संजय वैवाहिक जीवन सफल असून मान्यतान विवाहानंतर चित्रपटात काम करायच थांबवल आहे.सोशल मीडियावर सातत्यान संजय मान्यताच्या आनंदी कुटुंबाचे फोटो वायरलेस होत असतात.मान्यतान 2010 साली दोन गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला शरान आणि इकरा दोघांचेही आपल्या मुलांसमवेतले फोटो चाहत्यांना आवडत असतात.

नुकताच स्थिरस्थावर झालेल्या संजयच्या आयुष्यात त्याला फुप्फुसाचा कॅन्सर असून तो चौथ्या स्टेजवर असल्याची बातमी समोर आली असून संजय दत्त यावर अमेरिकेत उपचार करून घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अनेक संकटातून धीराने बाहेर पडणारा संजय या संकटातूनही मान्यताच्या साथीने बाहेर पडेल अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

About the author

Shyam Hajare

Add Comment

Click here to post a comment