शाहरुख खान बॉलीवुडचा किंग खान आहे. त्यांचा सिनेमा त्यांच्या चाहत्यासाठी एक पर्वणी असतो. त्यांचे चाहते अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. झीरो हा त्यांचा शेवटचा सिनेमा ठरला. त्या नंतर तो पडद्यावर दिसलाच नाही. आता शाहरुख लवकरच त्यांचा पठाण हा सिनेमा घेऊन येत आहे.
शाहरुखने त्यांच्या सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. शाहरुखने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पठाणचा टीजर शेअर केला आहे. यामध्ये शाहरुखचा धमाकेदार लुक दिसत आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 25 जानेवारीला त्यांचा हा सिनेमा रिलीज होणार आहे.
हिंदी सोबतच तामीळ आणि तेलगूमध्ये देखील हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शाहरुख म्हणतो मला माहीत आहे, खूप वाट पाहावी लागणार आहे. पण मला माहीत आहे पठाणचा काळ आता सुरू झाला आहे.
कारण 25 जानेवारी 2023 रोजी पठाण येतोय. टीजरमध्ये जॉन अब्राहमच्या संवादाने होते तो म्हणतो हमारे देश में हम नाम रखते है, हमारे धर्म और जाती से, लेकिन उसके पास येसा कुछ नही था, असे जॉन म्हणतो, त्या पाठोपाठ दीपिका देखील पठाणची ओळख करून देते.
त्यानंतर शाहरुखची पठाण लुकमध्ये एंट्री होते. या चित्रपटांमध्ये शाहरुख खान सोबतच अभिनेत्री दीपिका पादुकोण ही देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सोबतच जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. शाहरुख 2018 मध्ये झीरोमध्ये दिसला होता. त्या नंतर त्यांचा एक ही सिनेमा आला आहे.
शाहरुखच्या चाहत्याने राजा वापस आया है अशी पोस्ट केली आहे. शाहरुखचा टीजर येण्याने ट्विटरवर एकच चर्चा रंगली आहे. राज ईज बॅक