नागराज मंजुळे महाराष्ट्रातच काय संपूर्ण भारतातत चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रात आदराने घेतलं जाणार नाव ठरलं आहे. सैराट मराठी भाषेत आलेला सिनेमा पण गाणी त्यातले डायलॉग यामुळे संपूर्ण देशांत या चित्रपटांची चर्चा झाली. या चित्रपटाने 100 कोटी ची कमाई केली. सैराटचा रिमेक धडक देखील तितकाच हीट झाला.
त्यामुळे नागराज म्हणजे वेगळं काही असं एक नवीन समीकरण तयार झाले. प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांनी देखील नागराज सोबत काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. नागराजने अमिताभ यांना घेऊन झुंड सिनेमा करणार असल्याचे खूप आधी जाहीर केले पण कोरोनाच्या स्थितीमुळे सर्वच काही लांबणीवर पडले, पण अखेर नागराजने झुंडचे प्रदर्शनांची तारीख जाहीर केली. झुंडचा ट्रेलर रिलीज झाला आणि नागराजची एक वेगळी शैली पुन्हा समोर आली. नागराजच्या झुंडच्या ट्रेलरमध्ये दोन गोष्टीची प्रचंड चर्चा झाली.
एक म्हणजे अमिताभ यांचा एक डायलॉग तो म्हणजे ही मुलं एका दगडात डुक्कर आडवं करू शकतात, त्यांच्या हाती जर चेंडू मिळाला तर ते जगातील सगळ्यात वेगवान गोलंदाज बनू शकतील. हा डायलॉग प्रचंड गाजला आहे, तसेच दुसरी एक गोष्ट म्हणजे एका फ्रेममध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो. तीन मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये दूसरा मिनिट संपल्यानंतर जवळपास 10 सेंकदांनी दिसणारी फ्रेम ही चर्चेचा विषय ठरली आहे. बाबांसाहेबान सोबत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज हे देखील दिसत आहे.

मंजुळे यांच्या या कृतीमुळे महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आणि महाराष्ट्राचे पुन्हा एकदा नाव होणार आहे. हा बॉलीवुडमध्ये एक सकारात्मक बदल दिसून येणार आहे. हिंदी सिनेमाच्या मुख्य प्रवाहात हा महत्वाचा बदल ठरणार आहे. ही एक नवीन क्रांती आहे असे म्हटले जाते. नागराज यांच्या या ट्रेलरला प्रेक्षकांनी देखील तितकाच जोरदार प्रतिसाद दिला आहे. वेगळं कोणी काही करणार असेल तर फक्त आणि फक्त नागराज मंजुळेच करू शकतात असे म्हटले जात आहे.
झुंड या सिनेमात सैराट फेम रीनकु राजगुरू आणि आकाश ठोसर देखील या सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात देखील नागराज याने अनेक सर्वसामान्य चेहऱ्यांना नवीन संधी दिलेली आहे. नागराज सोबत अमिताभ ही जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.