दुनियादारी क्लासमेट दगडी चाळ अशा एकांहून एक अधिक उत्तम सिनेमा देणारा अंकुश चौधरीने आज पर्यत अनेक उत्तम सिनेमे दिले आहेत. अंकुश आज मराठीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे, पण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल अनेकांना फार कमी माहीत आहे.
अंकुश चौधरी याने अभिनेत्री दीपा परब हिच्याशी 2007 साली लग्न केले आहे. त्यांना प्रिन्स नावाचा एक मुलगा देखील आहे. अंकुश आणि दीपा कॉलेजमध्ये एकत्र होते. त्यांची एमडी म्हणजेच महर्षी दयानंद कॉलेजमध्ये ओळख झाली होती. त्या दोघांना देखील अभिनयाची आवड होती.

अभिनय आणि रंगभूमी ही दोघांची आवड सेम होती. कॉलेजमध्ये असताना दोघांनी देखील अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. आधी त्यांची मैत्री झाली आणि मग मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनी देखील करियर केले आणि त्या नंतर 2006मध्ये त्यांनी साखरपुडा केला. त्यांनी त्यांचा साखर पुडा अनेक दिवस लपवून ठेवला.

अखेर 2007 मध्ये त्या दोघांनी लग्न केले आणि जाहीर केले.केदार शिंदे यांच्या ऑलद बेस्ट या नाटकात दीपा आणि अंकुश एकत्र होते. दीपा आपल्याला अनेक जाहिराती आणि चित्रपटांत दिसली आहे.