Home » श्रीमंत घरातील मुलींशी लग्न करून हे अभिनेते झालेत सर्वात श्रीमंत घरचे जावई, २ नंबर चे नाव वाचून थक्क व्हाल
Celebrities मायानगरी

श्रीमंत घरातील मुलींशी लग्न करून हे अभिनेते झालेत सर्वात श्रीमंत घरचे जावई, २ नंबर चे नाव वाचून थक्क व्हाल

आपल्या भारतीय परंपरेनुसार प्रत्येक नात्याला खूप महत्व असते, जसे कि सासू, सासरे, आई, बाबा, बहिण, भाऊ, ई. पण सून आणि जावई या नात्यांचे एक वेगळेच स्थान आपल्या संस्कृतीत आहेत. त्यांना आपल्या स्वतःच्या मुला-मुलींप्रमाणे वागवले जाते. जावयाला काही कमी पडू न देणे हे जणू प्रत्येक कुटुंबाचे कर्तव्यच आहे.

बॉलीवूड मध्ये देखील असे अनेक जावई आहेत, ज्यांचे लग्न खूप श्रीमंत घरातील मुलींशी झाले आहे. जास्त करून प्रत्येकाचे प्रेम विवाह झाले आहेत, व आज या श्रीमंत कुटुंबातील सदस्य असून ते खूप सुखी आहेत. यातील अनेक अभिनेते कष्टाने मोठे झाले आहेत व प्रसिद्ध तर इतके झाले आहेत कि जगभरातील लोक त्यांना ओळखतात. वर त्यांचे या श्रीमंत कुटुंबांशी नावे जोडल्यावर त्यांचा दर्जा व महत्व हे. चला तर असेच काही नावे बघुयात.

अक्षय कुमार

खिलाडी अक्षय कुमार हा आत्ताचा एक सुपरस्टार आहे. राजेश खन्ना जो एके काळचा सर्वात मोठा स्टार होता त्यांची मुलगी ट्विंकल खन्ना हिच्याशी अक्षय ने २००१ साली लग्न केले. हे खूपच गोड जोडपे म्हणून मानले जाते.

धनुष

साउथचा हिरो धनुष याने ‘व्हाय धिस कोलावारी डी’ने संपूर्ण भारताला वेड लावले. व हाच गोड मुलगा अत्यंत नशीबवान आहे कि संपूर्ण भारतातला सुपरस्टार रजनीकांत याचा जावई बनण्याचा मान त्याने मिळविला आहे. त्याने २००४ मध्ये ऐश्वर्याशी लग्न केले. त्याने “रांझना” या सिनेमातून बॉलीवूड मध्ये देखील पाउल टाकले आहे.

शर्मन जोशी

थ्री इडियटस, गोलमाल सारख्या चित्रपटातून सगळ्यांना हसवणारा हा अभिनेता. याने बॉलीवूडच्या विलन, प्रेम चोप्रा यांच्या मुलीशी लग्न केले. २००० मध्ये शर्मन ने प्रेरणाशी लग्न केले व तो प्रेम चोप्रांचा जावई बनला.

कुणाल कपूर

अमिताभ बच्चन यांचे धाकटे बंधू म्हणजे अजिताभ बच्चन यांचा कुणाल कपूर जावई. धक्का बसला न? रंग दे बसंती मधील आपली सुंदर कामगिरी दाखवून कुणालने खूप लोकांच्या मनात स्थान बसविले. अजिताभ यांची मुलगी नायना हिच्या त्याने लग्न केलेले आहे.

अजय देवगण

सिंघम म्हणून ओळखला जाणारा आपला हिरो म्हणजे अजय देवगण. त्याने केवळ मारामारीचे नाही तर विनोदी भूमिका करूनही सर्वांचे मनोरंजन केले. १९९९ मध्ये त्यांनी काजोलशी लग्न केले व प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा हिचा जावई बनला.

कुणाल खेमू

पतौडी कुटुंबातील राजघराण्याचा जावई म्हणजे नशीबच चांगले असावे याचे. यांनी बऱ्याच फिल्म्स मध्ये काम केले आहे. सोहा आली खान हिच्याशी त्याने लग्न केले व आता त्यांना एक मुलगी देखील आहे.