Home » मुलगा सुपरस्टार असूनही, वडील चालवतात KSRTC बस. अस का करतात ‘Rocking Star’ यश चे वडील.
Celebrities Entertainment

मुलगा सुपरस्टार असूनही, वडील चालवतात KSRTC बस. अस का करतात ‘Rocking Star’ यश चे वडील.

दक्षिनात्य चित्रपटसृष्ठीमधील अत्यंत लोकप्रिय अभिनेता यश, आज तो लाखो रुपये कमवतो, पण त्याचे वडील KSRTC मध्ये बस चालकाची नोकरी करतात. यश चे खरे नांव नवीन कुमार गोवडा हे आहे, सुरुवातीला त्याने कन्नड च्या मालिकांमध्ये काम केले. त्याने २००७ मध्ये ‘Jambada Hudugi’ या चित्रपटातून चित्रपट सृष्टीमध्ये सुरुवात केली, आजवर यशने अनेक चित्रपटांत काम केले आहे. त्यच्याकडे ५० कोटी रुपयांची संपत्ती आहे असे म्हटलं जातं, त्याचा बंगळूरमध्ये जवळपास ४ कोटींचा बंगला आहे. यशला गाड्यांच खूप वेड आहे, त्याच्याकडे खूप साऱ्या महागड्या गाड्याही आहे. ‘Rocking Star’ ने अभिनेत्री राधिका पंडित हिच्याशी लग्न केले आहेत, व त्यांना दोन मुले सुद्धा आहेत.

तुम्हालाही प्रश्न पडला असेल कि कोट्यावधींच्या मालकाचे वडील हे चालक कसे असू शकतात? तर जाणून घेवूयात यशच्या वडिलांविषयी. यशचे वडील अरुण कुमार हे एक बस ड्रायवर आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले कि त्यांनी ड्रायविंग करून मिळणाऱ्या पैशामध्ये यशला लहानाचे मोठे करून स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणून अजूनही ते बस चालक आहेत. त्यांच्या या कार्याचे बाहुबली फेम डायरेक्टर राजामौली याने सुद्धा कौतुक केले. म्हणालेयश तुझे वडील आहेत खरे सुपरस्टार.