Home » देसी गर्ल प्रियांका चोपडा बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म
Celebrities Entertainment Uncategorized

देसी गर्ल प्रियांका चोपडा बनली आई, सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म


देसी गर्ल म्हणून ओळख असलेली बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोपडा हिने सरोगसीद्वारे एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. प्रियांकाचा नवरा प्रसिद्ध गायक निक जोनस याने आणि प्रियांकाने सोशल मिडियावर ही बातमी त्यांच्या चाहत्यांशी शेअर केली. प्रियांकाने पोस्टमध्ये लिहिले आहे, आम्ही आदरपूर्वक हा खास प्रसंग चाहत्यांना गोपनीयता बाळगण्याचे आवाहन करतो.

कारण आम्हाला आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आभार. प्रियांकाने सरोगसीद्वारे बाळाला जन्म दिला आहे. प्रियांकाने बातमी शेअर करताच तिच्यावर आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेक मोठ्या कलाकारांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्रियांका आणि निक यांनी 2018 साली राजस्थानमधील जोधपुर येथील उम्मेद भवन पॅलेसमध्ये लग्न गाठ बांधली होती.

दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले होते. मागील काही दिवसांपूर्वी प्रियांकाने तिच्या सोशल मिडिया खात्यावरुण निकचे नाव हटविले होते तेव्हा प्रियांका आणि निक वेगळे झाले आहेत अशा अनेक अफवा देखील समोर आल्या होत्या.पण या अफवा खोट्या ठरल्या आहेत. बॉलीवुडमध्ये आज पर्यत अनेक सेलिब्रिटीनी सरोगसीद्वारे अपत्य प्राप्ती केली आहे.