Home » घटस्फोट हे मृत्यु पेक्षा वेदनादायी असू शकतो, धनुष ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर या अभिनेत्यांचे विधान
Celebrities Entertainment

घटस्फोट हे मृत्यु पेक्षा वेदनादायी असू शकतो, धनुष ऐश्वर्या यांच्या घटस्फोटानंतर या अभिनेत्यांचे विधान

बॉलीवुड आणि घटस्फोट हे तसं जून समीकरण आहे, अनेकजण घटस्फोट घेतात आणि वेगळे होतात. नवीन लिंकअप होतात आणि ब्रेकअप देखील त्यामुळे त्यात वेगळे असे काही नाही पण बॉलीवुडमध्ये मागील काही दिवसांपासून घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. अभिनेता आमीर खान आणि त्यांची पत्नी किरण राव हे देखील मागील काही दिवसांपूर्वी वेगळे झाले होते.

अभिनेत्रीसमांथा रुथ प्रभूने देखील तिचा पती नागा चैतन्यला घटस्फोट दिला त्या पाठोपाठ साऊथ मधील आणखी एका प्रसिद्ध जोडीने काल त्यांचा घटस्फोट जाहीर केला आणि त्यांच्या सर्व चाहत्यांना एकच धक्का बसला. प्रसिद्ध अभिनेता धनूषने काल त्यांची पत्नी ऐश्वर्या पासून तो वेगळा होत आहे हे जाहीर केले. ऐश्वर्या ही प्रसिद्धी अभिनेते रजनीकांत यांची मुलगी आहे.

मागील काही दिवसांपूर्वी आणखी एका अशाच घटस्फोटांची चर्चा होती ती म्हणजे महाभारत फेम अभिनेते नितीन भारद्वाज यांनी देखील त्यांची आयएएस पत्नी यांच्या पासून घटस्फोट घेतला. नितीन म्हणतात तब्बल 12 वर्षानंतर आम्ही वेगळे झाले आहोत. नितीन सांगतात की सप्टेंबर २०१९ मध्ये मी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांना दोन जुळ्या मुली आहेत. त्या त्यांच्या आईसोबत इंदौर येथे राहतात. मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयात सप्टेंबर २०१९ घटस्फोटासाठी अर्ज केला.

आम्ही वेगळे होण्याचा निर्णय घेतला यामागचे कारण मला सांगायचे नाही पण घटस्फोट ही प्रक्रिया मृत्युपेक्षा वेदनादायी असू शकते. घटस्फोट घेत असताना प्रचंड मानसिक त्रास होतो. जर तुम्ही अनेकवर्ष एकत्र घालवल्यानंतर जर वेगळे होत असाल तर ते अधिकच त्रासदायक असते.पुढे ते म्हणतात माझा लग्नावर पूर्ण विश्वास आहे पण या बाबत मी लकी नाही.बऱ्याचदा लग्न अयशस्वी ठरण्यामागे अनेक कारणे असतात. अहंकार, तडजोड न करण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टी असू शकतात. घटस्फोटानंतर सर्वात जास्त त्रास लहानमुलांना होतो. त्यामुळे पालकांना मुलांना त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी