Home » द कश्मीर फाइल्स फिल्म बद्दल रितेश म्हणतो, हीच ती वेळ
Articles Entertainment

द कश्मीर फाइल्स फिल्म बद्दल रितेश म्हणतो, हीच ती वेळ

बॉलीवुड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या बहूचर्चित चित्रपटांची रिलीज नंतर देखील तितकीच चर्चा आहे. अनेक मान्यवर, कलाकार, दिग्दर्शक यांनी या चित्रपटांची तोंडभरून स्तुती केली आहे. अनेकांनी तर आव्हान केले आहे की तुम्ही हा चित्रपट नक्की पहा.

अभिनेता रितेश देशमुखने देखील नुकताच हा चित्रपट पाहिला आणि त्याने याबद्दल एक ट्विट केले आहे, या ट्विटची सर्वत्र चर्चा आहे. रितेश म्हणतो की अनेक विक्रम मोडीत काढत असलेल्या चित्रपटाचे कौतुक करण्याची हीच ती वेळ आहे. एक छोटा असा चित्रपट जो आता पर्यत सर्वात मोठा चित्रपटांपैकी एक बनण्याच्या मार्गावर आहे.

अनुपम खेर, विवेक अग्निहोत्री आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून अभिनंदन, तुमच्या टीमसाठी प्रचंड प्रेम आणि कौतुक देखील.

रितेशने चित्रपटांचे भरभरून कौतुक केले आहे. द कश्मीर फाइल्स या चित्रपटांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आणि अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या चित्रपटांचे भरभरून कौतुक केले आहे.

द कश्मीर फाइल हा चित्रपट 1990 झाली काश्मिरी हिंदूवर झालेल्या अत्याचारावर बनविलेला आहे. या चित्रपटांतून काश्मिरी पंडित आणि काश्मिरी हिंदू यांना कशाप्रकारे कश्मीर सोडावे लागले हे सर्व दाखविण्यात आले आहे. कॉंग्रेसने मात्र या चित्रपटांवर जोरदार टीका केली आहे.