दक्षिणेतील चित्रपट सध्या जोरदार गाजत आहेत. उत्तम कथानक, जबरदस्त अॅक्शन आणि उत्तम गाणी यामुळे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करतात. नुकताच आलेल्या पुष्पाने तर सारेच रेकॉर्ड मोडले आहेत. आता प्रेक्षकांना उत्सुकता आहे ती अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या आरआरआर चित्रपटांची. या चित्रपटात त्या दोघासोबत बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट्ट देखील दिसणार आहे.
या चित्रपटांतील थोर राष्ट्रपुरुषांना आंदराजली वाहताना दिसत आहे. हे गाणं आरआरआर सेलिब्रेशन अँथम आहे असे म्हटलं जात आहे. आलिया भटने ट्वीटरवर या गाण्यांचा विडियो शेअर केला आहे, शोले असे या गाण्यांचे नाव आहे. अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट यांनी या गाण्यात पारंपरिक पोषाखात उत्तम डान्स केला आहे.
Celebrate the magic of Indian Cinema with #RRRMovie from March 25th??
— Alia Bhatt (@aliaa08) March 14, 2022
The joyful #RRRCelebrationAnthem, #Sholay is here! ??????
▶️https://t.co/IDp3Px9XiK
या गाण्यांमध्ये याने थोर आदरांजली वाहली आहे. महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराज त्यांच्या सोबतच सुभाषच चंद्र बोस, सरदार वल्लभ भाई पटेल, भगत सिंग, आणि राणी लक्ष्मीबाई आणि इतर थोर राष्ट्रपुरुष यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, अभिनेता राम चरण आणि ज्युनियर एनटीआर आणि आलिया भट यासारखे मोठे कलाकर दिसणार आहेत.
सुमारे 450 कोटीचे या चित्रपटांचे बजेट आहे. हा चित्रपट हिंदी, तेलगू,तमिळ, कन्नड यामध्ये प्रदर्शित होणार आहे. 25 मार्च रोजी हा चित्रपट रिलीज होईल.